•   Thursday, August 14
शिक्षण

"सारे जहाँ से अच्छा" लिहिणारे कवी इक्बाल यांना अभ्यासक्रमातून हटवले

'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा’ हे लोकप्रिय गीत लिहिणारे कवी मोहम्मद इक्बाल यांना पॉलिटिकल सायन्स च्या बीएच्या अभ्यासक्रमातून हटवण्याचा निर्णय दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेने घेतला आहे.  त्यामध्ये ‘परिषदेने फाळणी, हिंदू अभ्यासक्रम आणि आदिवासी अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.


इक्बाल हे भारतीय उपखंडातील प्रमुख उर्दू आणि फारसी कवी आहेत. ते पाकिस्तानचे राष्ट्रीय कवी होते. पाकिस्तानच्या स्थापनेमागे त्यांच्या विचारांचेही योगदान असल्याचे मानले जाते. शुक्रवारी झालेल्या शैक्षणिक समितीच्या परिषदेमध्ये विविध अभ्यासक्रम आणि केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.


‘फाळणी, हिंदू आणि आदिवासींच्या अभ्यासासाठी केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. इक्बाल यांच्या विचारांना पॉलिटिकल सायन्सच्या ‘आधुनिक भारतीय राजनैतिक विचार’ या पेपरमध्ये स्थान देण्यात आले होते. परिषदेने सादर केलेल्या प्रस्तावांना विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या मंजुरीची आवश्यकता आहे. ही मंजुरी ९ जूनला मिळेल.