Saturday, November 16, 2024

Latest Posts

लाडकी बहीण योजनेचा किती फायदा ? शरद पवार म्हणालेत…

| TOR News Network |

Sharad Pawar Latest News : सत्ताधाऱ्यांनी  लोकांना खूश करण्यासाठी योजना आणली, लोकांना पैसे दिले. योजना किती दिवस टिकणार याची माहिती द्यायला हवी होती. आज निवडणुका काढायच्या ही त्यांची मानसिकता आहे. लाडकी बहीण योजनेतून महिन्याला पैसे देऊन त्यांनी महिलांना खुश केलं, पण त्याचा फार परिणाम होणार नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. (sharad pawar on ladki bahin yojana) त्यामुळे त्याचा काही परिणाम होणार नाही, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणालेत. अर्थसंकल्प मांडताना जुलै महिन्यात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. सरकारच्या या योजनेचा बराच बोलबाला झाला, अनेकांनी त्याचं कौतुक केलं. विरोधकांनी मात्र या योजनेवर कडाडून टीका करताना विधानसभा निवडणूक समोर ठेवून मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही योजना आणल्याचे टीकास्त्र सोडलं. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही लाडकी बहीण योजना चर्चेत असून महायुतीच्या नेत्यांकडून त्याचा वारंवार उल्लेख केला जातो. मात्र विरोधकांची विरोधी सूर अद्यापही कायम आहे.

याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनीही या योजनेबद्दल बोलताना लाडकी बहीण योजनेचा सत्ताधाऱ्यांना किती फायदा होईल यावर भाष्य केलं.सहा महिन्यांपूर्वीच्या निवडणुकीत आम्ही एकदम ३० वर गेलो. याचा अर्थ लोकांना मोदींची भूमिका पसंत नव्हती हे महाराष्ट्रात दिसत होतं. साताऱ्यातही आमची एक जागा आली असती. एकंदर चित्र गेल्या निवडणुकीप्रमाणे न बोलणारं आणि मतदानाच्या दिवशी रिअॅक्ट होणारं आहे.

आताची स्थिती वेगळी आहे. सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांना लोकसभा निवडणुकीचा जो फटका बसला, त्याची त्यांनी सीरिअस नोंदघेतली. लोकांना खूश करण्यासाठी त्यांनी लोकांना आनंदी ठेवणारी योजना आणली, लोकांना जास्तीत जास्त पैसे दिले. योजना किती दिवस टिकणार याची माहिती द्यायला हवी होती. पण त्यांनी दिली नाही. आज निवडणुका काढायच्या ही त्यांची मानसिकता आहे. उदा. लाडकी बहीण. दोन कोटी महिलांना १५०० रुपये दिले. त्यांना महिलांना खूश केलं. पण त्याचा परिणाम काही ना काही होईल. एवढे पैसे वाटले. पण फार परिणाम होणार नाही,असं शरद पवार म्हणाले.

पत्रकार परिषेदत शरद पवार यांनी लाडकी बहीणवरून निशाणा साधला. एकीकडे त्यांनी( सरकारने) मदत केली. पण महिलांवर अत्याचार वाढले आहे. माझ्याकडे आकडेवारी आहे. दोन वर्षात ६७ हजार अत्याचार महिलांवर झाले. ही लहान गोष्ट झाली नाही. मुली किंवा स्त्रिया बेपत्ता होण्याची माहिती आहे. ६४ हजार महिला आणि मुली राज्यात बेपत्ता आहे. त्यात गृहमंत्री ज्या जिल्ह्यातील आहे,त्या नागपुरातील ही नोंद होत आहे. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचे आणि दुसरीकडे स्त्रियांवर अत्याचार होत आहे. महिला गायब होत आहे. त्याचा काही परिणाम होईल ना, अशा शब्दांत शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं.

Latest Posts

Don't Miss