Sunday, November 17, 2024

Latest Posts

ठाकरे पिता-पुत्राचं टेन्शन वाढलं ; सरवणकरांची माघार नाहीच

| TOR News Network |

Amit Thackeray Latest News : सगळ्या राज्याचं लक्ष माहिम विधानसभा क्षेत्राकडे लागलं आहे. यंदा माहीममध्ये बिग फाईट आहे. माहीममधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे निवडणूक मैदानात उतरले आहेत.(Amit Thackeray from mahim) त्यांच्यासमोर सदा सरवणकर यांचं मुख्य आव्हान आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे गटाकडून महेश सावंत निवडणूक रिंगणात आहेत. सदा सरवणकर हे माहीममधले तगडे उमेदवार आहेत. (Sada sarvankar) त्यांनी माघार घ्यावी, यासाठी महायुतीकडून बरेच प्रयत्न सुरु आहेत.पण ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.त्यामुळे अमित ठाकरेंना पहिलीच निवडणूक सोपी राहणार नाही.

“महायुतीच्या सगळ्याच नेत्यांनी आशिर्वाद दिले होते. एबी फॉर्म दिला होता. लढण्याशिवाय पर्याय नव्हता. कर्तव्य समजून लढणार सांगत होतो. अर्थात या मतदारसंघात गेली 30 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. काही वर्ष नगरसेवक होतो, काही वर्ष आमदार होतो.(Sada sarvankar on mahim) इथले मतदार, मतदारसंघ आईसारखा वाटतो. आईसारखं प्रेम मतदारसंघावर केलं. रोज लोकांना भेटणं, त्यांच्या सुख:दुखात सहभाही होण हे मी नेहमीच माझं कर्तव्य समजलं. केलेलं काम, लोकांच प्रेम, यावेळची ही निवडणूक काळाजी गरज आहे, असे आदेश शिंदेसाहेबांनी दिल्यामुळे निश्चिंत होतो” असं सदा सरवणकर म्हणाले.

काल उमेदवारी अर्ज दाखल करताना मीडिया सोबत नव्हती, त्यावर सदा सरवणकर यांनी स्पष्टीकरण दिलं. “काल 3 वाजेपर्यंत फॉर्म भरण्याची वेळ होती. रॅली अडवावी, मी मतदान केंद्रापर्यंत पोहोचू नये, असे विरोधी व्यूहरचना करत होते असं सदा सरवणकर म्हणाले. तुम्हाला कोण अडवू शकतो? तुम्हाला कोणावर संशय आहे? त्यावर सदा सरवणकर म्हणाले की, “अनेक लोक आहेत, त्यांना असं वाटतय की सदा सरवणकरने उभच राहू नये. पण मतदारांच माझ्यावर प्रेम होतं, त्यांचा दबाव होता, काहीही करुन अर्ज भरा” दीपक केसरकरांच्या विषयावरही सदा सरवणकर यांनी भाष्य केलं. दीपक केसरकर माझे नातेवाईक आहेत. दिवाळी निमित्त ते मला भेटायला आलेले. उमेदवारी मागे घेण्याबाबत ते एक अवाक्षरही बोलले नाहीत. बाहेर जाऊन जर ते असं बोलत असतील, तर ते मोठे राजकीय नेते आहेत.

Latest Posts

Don't Miss