| TOR News Network |
Maharashtra Vidhansabha Seat Sharing : उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. अशात मात्र महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा कायम आहे. (yuti-aghadi seat sharing trouble continue) आज भाजपची तिसरी यादी येणार असल्याची माहिती आहे.तर महाविकास आघाडीच्या यादीवर देखील सर्वांचे लक्ष आहे. (yuti-aghadi Candidate list to release today)
आतापर्यंत महायुतीकडून, भाजप – 121, शिंदे गट – 65, अजित पवार गट – 49 उमेदवार जाहीर केले आहेत.तर महाविकास आघाडीकडून,काँग्रेस – 99,ठाकरे गट – 84 तर शरद पवार गट – 76 उमेदवारांनी तिकीट देण्यात आले आहे.
महायुतीकडून 235 जागा तर (mahayuti declared 235 seats) महाविकास आघाडीकडून 259 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. (Mahavikas aghadi declared 259 seats) अद्यापही महायुतीच्या 53 तर महाविकास आघाडीच्या 29 जागांवर उमेदवार दिलेले नाहीत. त्यामुळे अद्यापही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही.
27 ऑक्टोबर रोजी काँग्रेसने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या चौथ्या यादीत एकूण 14 उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसनं चौथ्या यादीत आधीचे दोन उमेदवार बदलले आहेत. यामध्ये अंधेरी पश्चिम येथे सचिन सावंत यांच्या जागी अशोक जाधव यांना संधी दिली आहे. तर औरंगाबाद पूर्वमधून मधूकर देशमुख यांच्या जागी लहू शेवाळे यांना पक्षाने तिकीट दिलं आहे. तर शिवसेना शिंदे गटाने विधानसभा निवडणुकीसाठीची उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. शिवसेनेच्या दुसऱ्या यादीत 20 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या यादीत शिवसेनेने 45 उमेदवारांची घोषणा केली होती.