| TOR News Network |
Aditya Thackeray Latest News : विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने आपल्या पहिल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर शिंदे गट आणि अजित पवार यांच्या गटाच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. याशिवाय महाविकास आघाडीतील मतभेद दूर होऊन आज दुपारी किंवा रात्री पर्यंत त्यांच्या उमेदवारांचीही यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहेत. अशातच महायुतीने वरळीत अधिक लक्ष घातले आहे.त्यासाठी शिंदे-भाजपचा मेगा प्लॅन आखला आहे. (mahayuti mega plan to counter Aditya thackeray)
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळीत शिंदे गट आणि भाजपकडून मोठी फिल्डींग लावण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यानुसार, वरळी विधानसभा मतदारसंघात आगित्या ठाकरे यांच्या तोडीचा उमेदवार देण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने रणनीनी आखण्यास सुरूवात केली आहे. वरळी विधासभा मतदारसंघ हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघातून त्यांचा पराभव करू शकेल, अशा उमेदवाराची चाचपणी दोन्ही पक्षांकडू सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या महितीनुसार, वरळीतून भाजपच्या शायना एन.सी यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.( Shaina NC to contest from worli)
याशिवाय, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी खासदार मिलिंद देवरा यांच्याही उमेदवारीची चर्चा सुरू आहे.त्यामुळे वरळीतून महायुतीकडून कोणता उमेदवार उतरवला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या जागावाटपातील सुत्रानुसार,वरळी विधासभा मतदारसंघ हा एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला जाणार आहे.
त्यामुळे शायना, एन.सी यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यामुळे ही जागा शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अगदीच गरज भासल्यास वरळीतून एकनाथ शिंदे यांच्याच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला याठिकाणी मैदानात उतरवले जाऊ शकते, अशीही चर्चा राजकी वर्तुळात सुरू आहे.