Monday, November 18, 2024

Latest Posts

900 एकरचं मैदान, 200 एकरवर पार्किंग, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी

| TOR News Network |

Manoj Jarange Patil Latest News : काल राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कुठलीच चर्चा झाली नाही. (Maratha reservation cabinet meeting) पण, मराठा समाजाला आोबीसीतून आरक्षण देण्याची मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यातच, पहिल्यांच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठ्यांचा दसरा मेळावा होत असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. (Jarange patil dusra)बीड जवळील नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे. (Manoj Jarange Patil Dasara Melava) या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. नारायण गडावरील हा मेळावा होणार आहे.(jarange patil Dasara melava on narayangadh) या मेळाव्यातून जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण मराठा समाज व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना मनोज जरांगे पाटील यांचा बीडमधील नारायण गडावर पहिला दसरा मेळावा होत आहे. या दसरा मेळाव्याची तयारी जोरदार सुरू आहे. नारायण गडाच्या एकूण 900 एकर क्षेत्रावर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसर भगवामय झाला आहे. (jarange patil dasara melava on 900 acres ) मेळाव्यासाठी येणाऱ्या बांधवांची पूर्ण व्यवस्था करण्यात आली असून ऑक्टोबर महिन्यातील हिट लक्षात घेता पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आल्याचं संयोजकांनी सांगितले आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील पहिल्या दसरा मेळाव्यात नेमकं काय बोलतील, आपली भूमिका जाहीर करतील का, राजकीय निर्णय घेतील का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मेळाव्यातून मिळणार आहेत. त्यामुळे, राज्यभरातून मराठा बांधव या मेळाव्याला उपस्थिती दर्शवणार आहेत.

नारायण गडावर होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. 10 वैद्यकीय कक्ष उभारण्यात आले असून ज्या सुविधा आयसीयु विभागात दिल्या जातात, त्याच सुविधा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. येथे येणाऱ्या बांधवांना तात्काळ वैद्यकीय सेवा मिळणार आहे. तर, 100 पेक्षा जास्त रुग्णवाहिका तैनात असणार आहेत. येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता, तब्बल 200 एकरवर पार्किंकची व्यवस्था असणार आहे. 

Latest Posts

Don't Miss