Monday, November 18, 2024

Latest Posts

विदर्भातून राज ठाकरे यांची सरकारवर टीका ; महिलांन अशा प्रकारे पैसे देऊ नका

| TOR News Network |

Raj Thackrey Latest News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.( Raj Thackrey in vidharbha tour) विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे कसून तयारीला लागली आहे. अमरावतीमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य करत सरकारवर टीका केली आहे.( Raj Thackrey slams maha govt)

विधानसभा निवडणुका समोर ठेवून मतदारांना, प्रामुख्याने महिलांना आकर्षित करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली असा आरोप विरोधकांकाडून सातत्याने केला जातोय. मात्र विरोधकांच्या पोटात दुखतंय असं म्हणत सरकार या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्यात मग्न आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत.( Ladki Bahin yojana news) जुलै महिन्यात घोषणा झालेल्या या योजनेसाठी आत्तापर्यंत लाखो महिलांनी अर्जकेले असून अनेकींचा खात्यात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांचे पैसे जमा झालेत. मात्र विरोधांकाची त्यावरून अद्याप टीका सुरूच असून आता त्यामध्ये एका नेत्याचे नाव जोडलं गेलं आहे.(opposition slams govt on Ladki Bahin yojana)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरून महत्वाचं वक्तव्य केलं आहे. (Raj Thackrey on Ladki Bahin yojana)विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे कसून तयारीला लागली असून राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. अमरावतीमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं. ‘ जानेवारीत पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाहीत’ असं राज ठाकरे म्हणाले. ‘ राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर ते चुकीचं आहे. महिलांन अशा प्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणा’ असं म्हणत राज ठाकरेंनी या योजनेवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.

Latest Posts

Don't Miss