| TOR News Network |
Sharad Pawar Latest News : विधानसभेची निवडणूक बघता सध्या अनेक नेते तिकीट मिळवण्यासाठी धावपळ करत असून तशी फिल्डींग लावत आहे. त्यासाठी अनेक नेते पक्षांतर देखील करत आहे. सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येणाऱ्यांची संख्या सगळ्यात अधिक आहे.आता त्.त अधिक भर पडणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेते मधुकर पिचड (Madhukar Pichad vaibhav pichad to join sharad pawar ncp) आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड हे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेल्याची माहिती मिळत आहे. दोघेही पिता-पुत्र पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. (pichad family to rejoin sharad pawar ncp)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवार यांच्यासोबत पिचड कुटुंबाची अर्धा तास चर्चा झाल्याचं समजत आहे.(madhukar-vaibhav pichad at silver ooak) सध्या पिचड कुटुंबीय भाजपमध्ये आहे. पण, महायुतीत अकोले विधानसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटत असल्यामुळे पिचड कुटुंबीय शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हातात घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये अकोले विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.
मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी शरद पवार यांची यापूर्वी अनेकदा भेट घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 2019 मध्ये मधुकर पिचड आणि त्यांचे माजी आमदार वैभव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र विधानसभा निवडणुकीत वैभवचा पराभव झाला आणि राष्ट्रवादीचे किरण लहामटे विजयी झाले.
मधुकर पिचड हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. 2019 मध्ये किरण लहामटे यांनी वैभव पिचड यांचा पराभव केला. त्यांना अकोले विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. (vaibhav picha to contest vidhansabha) या पार्श्वभूमीवर पिचड कुटुंबीयांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात परतण्याचा निर्णय घेतला आहे. मधुकर पिचड आणि वैभव पिचड राष्ट्रवादी-सपामध्ये गेल्यास संभाजीनगर जिल्ह्याचे राजकीय समीकरण बदलू शकते. भाजपसाठी हा मोठा धक्का असू शकतो.