| TOR News Network |
Balasaheb Thorat latest News : काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महायुतीवर चांगलीच बोचरी टीका केली.(Balasaheb thorat slams mahayuti) ते म्हणाले महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार असून महायुतीच्या नेत्यांनी आता मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा विरोधी पक्ष नेता कोणा होणार यावर चर्चा करायला हरकत नाही, असा टोला त्यांनी नागपूरात लगावला.
बाळासाहेब थोरात यांनी नागपूरमध्ये एका वृत्त वाहिणीशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीचं जागावाटप, वन नेशन वन इलेक्शन याबाबत भाष्य केलं.(Balasaheb thorat on one nation one election) महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार असून महायुतीच्या नेत्यांनी आता विरोधी पक्ष नेता कोण होणार यावर चर्चा करायला हरकत नाही, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला. (Balasaheb thorat on mahavikas aghadi)
बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात देखील बोलले. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरु आहेत. आम्ही ज्यावेळी चर्चेला बसतो त्यावेळी एक एक मतदारसंघाचं नाव पुढं येत असतं. त्या मतदारसंघावर आम्ही दावा करतो, काही वेळा मित्रपक्षांकडून दावा केला जातो, असं थोरात यांनी म्हटलं.
महाविकास आघाडीत 125 जागांवर कोणताही वाद नसल्याने त्याचा तिढा सुटला. आता फक्त 30 जागेवर पेच बाकी आहे तर उर्वरित जागा चर्चेतून सुटण्याच्या मार्गावर असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. (Balasaheb thorat on seat sharing) आम्हाला मित्र पक्षांना देखील काही जागा सोडाव्या लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर, जागा वाटपाच्या चर्चेत एका एका मतदारसंघावर चर्चा होत असल्याचं त्यांनी म्हटलं. आपल्या देशातील स्थिती पाहिली असता वन नेशन आणि वन इलेक्शन अवघड असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. महाराष्ट्रची निवडणूक एक महिना लांबणीवर गेल्या असल्याच्या मुद्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीत जागांची चर्चा सुरू आहे. प्रत्येक पक्ष हव्या असलेल्या जागांवर दावा करतो. मात्र त्या संदर्भात तिढा निर्माण होणार नाही, आम्ही समोरासमोर बसून ते सोडवू, असं म्हटलं. येणाऱ्या दहा दिवसात मविआचं जागावाटपाचं सूत्र समोर येईल, असंही नाना पटोले यंनी म्हटलं.
मुख्यमंत्रिपदाच प्रश्न विचारला असता काँग्रेस पक्षाने दावा करणे किंवा सोडणे हे महत्त्वाचे नाही.लोकशाहीत जनता सरकार बनवते. राजकारणात जर तर ने चर्चा करता येत नाही. भाजपचा विकास किती पोकळ आणि नकली आहे हे समोर आणणे महत्त्वाचे आहे,असं नाना पटोले म्हणाले.