| TOR News Network |
Bjp Maharashtra Latest News : राज्यात विधानसभा निवडणुक पाहता राजकीय पक्षांकडून जोरात तयारी सुरु झाली आहे. होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी भाजपकडून फक्त राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील नेत्यांची फौज मैदानात उतरवली जाणार आहे. भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची सूत्रे पडद्यामागून हलवणार आहेत. त्यासाठी विविध राज्यातील नेत्यांकडून महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. (Bjp National Leader in maharashtra)
अनेक केंद्रीय मंत्र्यांसह दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांमध्ये दौरे सुरु केले आहेत. (Bjp Leaders on tour to maharashtra) त्या मतदार संघांचा आढावा घेतला आहे. मतदार संघाचा दौरा करणाऱ्या या नेत्यांची मुंबईत भाजप मुख्यालयात बैठक झाली.(Bjp Leaders Meeting in mumbai) या बैठकीत भाजप प्रभारी भुपेंद्र यादव, सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, माजी मंत्री प्रल्हाद पटेल, मंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यासह इतर नेते सहभागी झाले. ज्या जागा भाजपकडेच राहणार आहे, त्या ठिकाणावरची रणनीती या नेत्यांकडून आखली जात आहे. तसेच महायुतीमधील पक्षांना मदत करुन राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी नियोजन केले जात आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर होताच भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील स्टार प्रचार मैदानात उतरणार आहेत. तसेच बड्या नेत्यांवर विशिष्ट मतदार संघाची जबाबदारी वाटण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, म्हणून राज्य सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवली जात आहे. त्यात लाडकी बहीण सारख्या योजनेत जास्तीत जास्त महिलांचा सहभाग करुन घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.