Sunday, November 17, 2024

Latest Posts

धक्का बसणार; शरद पवारांच्या स्वागतासाठी पोहचला भाजपाचा आमदार

| TOR News Network |

Sharad Pawar Latest News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची राजकीय खेळी अजून पर्यंत कोणालाच कळाली नाही. ते कधी कोणता व कसा डाव खेळतील याची साधी भनक देखील कोणलाच लागू देत नाही. सध्या विधानसभा निवडणूकांचे वारे जोरात वाहत आहेत. अशात महायुतीमधील अनेक दिग्गज नेते शरद पवारांच्या भेटी घेत त्यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत.(Mahayuti Leaders Meeting Sharad Pawar)अशात गेले दोन दिवस शरद पवार नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या स्वागतासाठी चक्क भाजपचे ते आमदार आले होते. याची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू आहे.(Bjp Mla Welcome Sharad Pawar)

राज्य विधानसभेच्या निवडणुकी जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतशी राजकारणातही वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. महायुतीसह इतर अनेक पक्षांचे नेते मंडळी शरद पवार यांच्या गाठीभेटी वाढू लागल्या आहेत.शरद पवार धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी भाजपचे आमदार अमरिश पटेल हेदेखील  शरद पवार यांच्या स्वागताला हजर होते. शिंदखेडा तालुक्यातील मेळाव्यानिमित्त शरद पवार शिरपूरच्या विमानतळावर पोहोचले त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अमरिश पटेल तिथे आले होते.(Bjp Mla Amrish Patel Welcome Sharad Pawar) त्यांना तिथे पाहिल्यानंतर शरद पवार यांनी ‘तुम्ही तर दुसऱ्या पक्षाचे आहात’ असे प्रतिक्रीया दिली. पण हे ऐकताच तिथे उपस्थित असलेल्यांमध्ये एकच हशा पिकला.

पण अमरिश पटेल यांनी शरद पवारांच्या स्वागताबद्दल खुलासा केला. पण त्याचवेळी त्यांनी, शरद पवार यांनी आपल्याला राजकारणात संधी दिल्याचे सांगून संकेत दिल्याची चर्चा आहे. दरम्यान, एकेकाळी धुळे आणि नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. पण 2019 च्या विधानसबा निवडणुकीपूर्वी नंदुरबारचे गावित कुटुंब आणि शिरपूरचे अमरिश पटेल यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि भाजपात प्रवेश केला.

तर,  शिंदखेड्याच्या मेळाव्यात बोलताना, शरद पवार यांनी शेतमालाचे घसरलेले भाव आणि दमदाटीच्या राजकारणावरून भाजपवर टीका केली. “मी दहा वर्षे कृषीमंत्री  म्हणून काम केले. त्यवेळी देश अन्नधान्यांच्या बाबत स्वंयपूर्ण झाला. पण आजच्या राज्यकर्त्यांना शेती आणि शेतकऱ्यांविषयी कसलीही आपुलकी नाही. शेतीसंदर्भातलं योग्य धोरण राबवले जात नाही. केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी आणली. कांद्याला भाव मिळाला नाही. गहू, तांदळाबाबतही हेच झालं. जे पिक घ्याल त्या धान्यावर, उत्पादनावर निर्यात बंदी केली. केंद्रातील मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे.’ अशा शब्दांत शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला.

Latest Posts

Don't Miss