Saturday, November 16, 2024

Latest Posts

फडणवीसांच्या विदर्भात भाजपच्या माजी मंत्र्याकडून बंडखोरीचा इशारा

| TOR News Network |

Mahayuti Latets News : सध्या सर्वाच पक्षात विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवी याकरिता रस्सीखेच सुरु आहे. इच्छूक उमेदवार आपल्या सोयीनुसार फिल्डींग लावत आहे. असे असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विदर्भात पहिली बंडखोरी समोर आली आहे. भाजपच्या माजी राज्या मंत्र्याने महायुतीला बंडखोरीचा इशारा दिला आहे.(Bjp Former minister to contest election Independent ) जर मला महायुतीकडून तिकट मिळाले नाही, तर मी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढेन अशी भूमिका या नेत्याने स्पष्ट केली आहे. (Bjp Leader Warning to stand Independent in Vidhansabha Election)

गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांचे अहेरी विधानसभा क्षेत्राकडे लक्ष लागले असून सध्या राजकारण तापले आहे. “मी अहेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. ( Aheri Vidhansabha election 2024) याबद्दल तिकीट वाटपाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. पण जर मला महायुतीकडून तिकट मिळाले नाही, तर मी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढेन. अपक्ष म्हणून ही निवडणूक लढण्यास मी तयार आहे”, असा इशारा भाजपचे नेते व माजी मंत्री अंबरीश आत्राम यांनी महायुतीला दिला आहे.(Ambrish Atram Warns Mahayuti Leaders)

“मी भाजप पक्ष सोडला तरीही भाजप पक्षाचे कार्यकर्ते माझ्यासोबतच असणार आहेत. त्यामुळे मी या विभागातून निवडणूक लढवणार म्हणजे लढवणारच” असा निर्धार अंबरीश आत्राम यांनी केला आहे. सध्या अहेरी विधानसभेतून तीन आत्राम यांचे आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अंबरीश आत्राम हे २०१४ ते २०१९ या काळात आमदार म्हणून निवडून आले होते. सध्या अहेरीत विद्यमान आमदार हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. त्यामुळे महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला सुटेल अशी चर्चा आहे. यामुळे धर्मरावबाबा आत्राम, भाग्यश्री आत्राम आणि अंबरीश आत्राम यांच्यात लढाई होणार आहे.(Dharmraobaba atram,bhagyashri atram and ambarish atram in aheri vidhansabha election circle)

अहेरी विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. यंदा या मतदारसंघात बाप-लेक-पुतण्यात अशी राजकीय लढत होणार आहे. भाजप नेते आणि माजी आमदार अंबरीश आत्राम हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी विधानसभेच्या तोंडावर बंड करत शरद पवार गटात प्रवेश केला.(bhagyashri atram join sharad pawar ncp) शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा अहेरीत आली तेव्हा त्यांचा हा पक्षप्रवेश सोहळा झाला. आता यावर धर्मरावबाबा आत्राम यांचे पुतणे अंबरीश आत्राम यांनी निशाणा साधला. “हा सर्व धर्मराव आत्राम आणि त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांचा गेम आहे. जर दोन्ही पक्षातून कोणीही निवडून आले तर आमदारकी घरीच राहणार हा आत्राम यांचा गेम आहे”, असे अंबरीश आत्राम म्हणाले.( Ambrishrao Atram criticism on Dharma Rao Baba Atram daughter Bhagyashree Atram)

Latest Posts

Don't Miss