Sunday, November 17, 2024

Latest Posts

पावरफुल्ल पवारांच्या भेटीसाठी इच्छूकांची गर्दी ; महायुतीतून वन साईड इनकमिंग सुरु

| TOR News Network |

Sharad Pawar Latest News : राजकारणातील बाप माणूस असे सर्वसामान्यात ओळखले जाणारे शरद पवार यांच्या पक्षात महायुतीतील नेत्यांची इनकमिंग सुरुच आहे. (Mahayuti Leader’s incoming into Sharad pawar’s NCP) समरजित घाटगे, बाबाजानी दुर्रानी, धैर्येशील मोहिते पाटील, अनिल सावंत, संजयकाका पाटील, राजेसाहेब देशमुख, भाग्यश्री आत्राम अशा अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीला जय महाराष्ट्र ठोकत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पहिली पसंती दर्शवली आहे. (Mahayuti Leaders joining sharad pawar party) विधानसभा निवडणूकांपूर्वी शरद पवारांकडे वन साईड होणारी इनकमिंग महायुतीसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. (Sharad Pawar to shock Mahayuti)

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शरद पवार गटात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु झालीय. दरम्यान मागील काही दिवसात महायुतीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतलीय. (many Mahayuti Leaders meet Sharad Pawar) त्यामुळे शरद पवार पुन्हा एकदा महायुतीला धक्का देणार का? असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाला आहे.

भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली.(Sanjaykaka patil meet sharad pawar) तसंच बीड जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुखांनी देखील शरद पवारांची भेट घेतली आहे.(rajsaheb deshmukh meet sharad pawar) त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी महायुतीला धक्के द्यायला सुरुवात केली आहे. भाजपचे माजी खासदार संजय काका पाटलांनी काल शरद पवारांची भेट घेतली.

दरम्यान संजयकाका पाटीलच नव्हे तर इतर राजकीय नेत्यांनी देखील शरद पवारांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे.  बीड जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुखांनी शरद पवारांची सिल्व्हर ओकवर भेट घेतली. परळीतून राजेसाहेब देशमुख विधानसभा लढवण्यासाठी इच्छूक आहेत. इंदापूरमधून आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी देण्यात यावी यासाठी इंदापूरमधील शिष्टमंडळ बारामतीत पवारांना भेटले.

अजित पवारांच्या ताब्यात असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केशव जगतापांनी देखील शरद पवारांची भेट घेतली.(keshav jagtap meet sharad pawar) माजी आमदार विलास लांडे यांनी देखील मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली.

दोन दिवसांपूर्वी धैर्येशील मोहिते पाटलांनी देखील पंढरपूर आणि मंगळवेढ्यातील इच्छूक उमेदवारांची शरद पवारांसोबत भेट घालून दिली होती. यामध्ये तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत देखील उपस्थित होते. पंढरपूर-मंगळवेढ्यातील इच्छूक उमेदवारांची शरद पवारांसोबत भेट घालून दिली. मागील काही दिवसांपासून शरद पवार गटात इनकमिंग सुरु झाली आहे.

गुरुवारी अजित पवार गटाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. (baghyashree atram join sharad pawar ncp) समरजित घाटगेंनी देखील भाजपला सोडचिठ्ठी देत तुतारी फुंकली. सोनाई उद्योगाचे संचालक प्रवीण मानेंनी देखील धक्का देत तुतारी हातात घेतली. बाबाजानी दुर्राणींनी देखील दादांची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश केला होता.(babajani durani join sharad pawar ncp)

Latest Posts

Don't Miss