Monday, November 18, 2024

Latest Posts

महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला ; १०० जागांवरील उमेदवार जवळपास फायनल

| TOR News Network |

Mahayuti Vidhansabha latest News : विधानसभा निवडणुकीची तारीख अजून जाहीर व्हायची आहे. पण राज्यात निवडणुकीचे वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. वेळेवर कोणतीच गडबड नको आणि जागा वाटपावरुन नाराजी सत्र टाळण्यासाठी महाविकास आणि महायुती आटोकाट प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षात १२५  जागांवर सहमती मिळाली असताना आता महायुतीत सुद्धा १००  जागांचा फॉर्म्युला ठरल्याचे समोर आले आहे. (Mahayuti 100 Sear Formula)

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीची १२५ जागांवर सहमती झाल्याची माहिती दिली. (Vijay Waddeitwar on Seat Sharing) काही जागांबाबत चर्चेअंती निर्णय होणार आहे. महाविकास आघाडीने लोकसभेतील चुका टाळण्यासाठी समन्वय ठेवला आहे. मात्र अजून त्यांनी जागा वाटपाची घोषणा केली नाही.

येत्या पंधरवाड्यात महायुतीच्या १०० जागा जाहीर करण्याचं महायुतीचं लक्ष आहे.(Mahayuti to declare 100 seats soon) महायुतीकडून जागा वाटपाच्या फॅार्म्युल्यावर बैठकसत्र सुरूच राहणार आहे. मात्र ज्या जागांमुळे जागावाटपाच्या फॅार्म्युलावर काहीच अडचण येणार नाही अशा जागा जाहीर करण्यात येणार आहे. विद्यमान आमदार असणाऱ्या महायुतीच्या १०० जागा पितृ पंधरवाडा झाल्यावर लगेच जाहीर करण्यासाठी महायुतीची जोरदार तयारी सुरू आहे.यात १०० उमेदवार जवळपास फायनल झाले आहेत.

५० – २५ – २५ असा १०० जागांसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये मोठा भाऊ अर्थातच भाजप असणार आहे. (Bjp Big Brother in Vidhansabha Election) भाजपच्या ५० तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी २५ जागा असतील. जागा वाटपाचा निर्णय महिनाअखेर जाहीर करण्यावर महायुतीने भर दिला आहे.(Bjp 50 Ncp And Shivsena 25 seats each) १०० जागा जाहीर होताच महायुतीचा प्रचाराचा प्रत्यक्ष धडाका सुरू होणार आहे. पहिल्या १०० जागांमध्ये कोणाकोणाचे नंबर लागणार याकडेही सर्वांचच लक्ष लागलं आहे. उमेदवाराला प्रचार प्रसारासाठी जास्तीत जास्त वेळ मिळावा यासाठी भाजपनं हा पुढाकार घेतला आहे.

Latest Posts

Don't Miss