| TOR News Network |
Sanjay Raut Latest News : सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांच्या पुतळा पडल्या नंतर तब्बल ११ दिवस फरार असलेला मुख्य आरोपी जयदीप आपटेला अटक करण्यात आली. (Jaydeep Apte Arrested) तो सध्या सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणी त्यांना अटक झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे.(Sanjay Raut Blame on jaydeep apte bail ) जयदीप आपटेंच्या जामिनाच्या ठाण्यातून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला.(Sanjay Raut to Media on jaydeep Apte) यावेळी त्यांनी जयदीप आपटेच्या अटकेबाबत भाष्य केलं आहे. जयदीप आपटेचा बॉस त्यांना वाचवू शकला नाही. आता जयदीप आपटेला अटक होण्याआधी सिंधुदुर्गाच्या कोर्टात त्यांच्या जामिनाची तयारी आठ दिवसांपासून सुरू आहे. त्यासाठी ठाण्यातून सूत्र हलत आहेत.(Aptes bail Preparation from thane) मी वारंवार ठाण्याचा उल्लेख करतोय. दोन दिवसात आपटे सरेंडर होतील, ताबडतोब त्यांच्या जामिनाची व्यवस्था करा, अशी सूत्रे ठाण्यातून हलत आहेत. आपटेंना ठाण्यातूनच कायदेशीर मदत मिळत आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, आपटे यांचे वकील गणेश सोहनी हे त्यांच्या नातेवाईकांसह कल्याण डीसीपी कार्यालयात पोहोचले होते. मात्र जयदीपला सिंधुदुर्ग येथे नेल्याची माहिती त्यांना मिळाली आहे. मात्र, जयदीप आपटे यांनी ठरवून स्वतःहून समर्पण केले असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे.(Jaydeep apte surrender himself claim by his advocate) पुतळा दुर्घटनेनंतर त्यांच्यावर सर्व दोष ठेवून राजकारण सुरू असल्याने त्यांनी रात्रीच्या अंधारात समर्पण केल्याचे सोहनी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आपटे यांच्या गेल्या 15 दिवसांपासून पोलीस शोध घेत होते. त्यासाठी आपटे यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, आपटेला अटक झाल्यानंतर त्याचे कुटंबीय गायब झाले आहे. आज पहाटे 4 वाजता अंधाराचा फायदा घेऊन आपटे कुटुंबाने पोबारा केला आहे. (jaydeep aptes family not at home) हे कुटुंब कुठे गेलं? याची पोलिसांना काहीच माहिती नाहीये. त्यामुळे पोलिसांचं काम वाढलं आहे. या कुटुंबाचा शोध घेण्यात येणार आहे.