Sunday, November 17, 2024

Latest Posts

रोहित पवारांकडून राज ठाकरेंना चिमटे

| TOR News Network |

Rohit Pawar Latest News :  राज ठाकरे यांनी यंदाच्या विधानसभेत दोनशे पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उतरवणार असे घोषित केले आहे. काही ठिकाणी त्यांनी उमेदवार देखील जाहीर केले आहेत. (Raj Thackeray Declared Candidate) हे सर्व राज ठाकरे भाजपच्या सांगण्यावरून करत आहेत. ज्या पद्धतीने राज ठाकरे वक्तव्य करत आहेत त्यावरून त्यांना भाजपनेच घोड्यावर बसवलेलं दिसतय. असं असलं तरी मनसेच्या प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक मतदार संघात केवळ दोन हजार मत मिळतील असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहित पवार यांनी थेट राज ठाकरे यांना डिवचत चांगलेच चिमटे काढले आहेत. (Rohit Pawar on Raj Thackeray)

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत एकला चलो रे ची भूमिका मांडली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे विधानसभेला ते महायुतीत असतील असा अंदाज होता. मात्र राज ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचे निश्चित केले आहे.  त्यावर आता रोहीत पवार यांनी टिका करत राज यांना चिमटे काढले आहे. राज यांनी हा निर्णय का घेतला? त्यांच्या प्रत्येक उमेदवाराला किती मते मिळतील?  हेच त्यांनी सांगून टाकले. यावरून त्यांनी राज यांना डिवचले आहे. ते अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी आपले मत मांडले.

दरम्यान यावेळी रोहित पवार यांनी महिलां बंदूका द्या या अमरावतीमधील शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. ज्या आर्थी हा नेता महिलांना बंदूका द्या असं वक्तव्य करतो त्या अर्थी त्यांच्यात सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीत हे त्यांनाही वाटत आहेत.(Rohit Pawar On Women Safety) महिलांची सुरक्षा करण्यास हे सरकार अपयशी ठरत आहे हे त्यांनीच मान्य केलं आहे. त्यामुळेच त्यांनी ही मागणी केली असावी असेही ते म्हणाले.

हेरगिरी करण्यासाठी वाढवली सुरक्षा
शरद पवारांची सुरक्षा निवडणुकीच्या तोंडावर का वाढवली जाते यावर ही त्यांनी भाष्य केलं. (Rohit Pawar on Sharad Pawar Security) निवडणुकीच्या तोंडावर जर सुरक्षा वाढवली जात असेल तर ते कोणाला भेटतात? का भेटतात? काय चर्चा केली जाते? याची हेरगिरी करण्यासाठी असू शकते अशी शक्यता त्यांनी यावेळी उपस्थित केली. शिंदे गटाच्या प्रत्येक आमदारांबरोबर दहा-दहा पोलीसांची सुरक्षा आहे. सुरक्षा ही सामान्य लोकांच्या सुरक्षेसाठी वापरली जावी असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Latest Posts

Don't Miss