| TOR News Network |
Mahavikas Aghadi Latest News : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक बघता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत एक पक्ष सामील होण्याची संकेत मिळत आहे.(One Party to Join Mahavikas Aghadi) राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक बडा पक्ष महाविकास आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे. तशी चर्चा महाविकास आघाडीतील पक्षात चर्चा सुरु आहे. ही चर्चा सकारात्मक झाली तर महाविकास आघाडीतची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
राज्यात एमआयएमची महाविकास आघाडीसोबत आघाडी होण्याची शक्यता आहे.(Mim to Join Mahavikas Aghadi) एमआयएमने महाविकास आघाडी सोबत जाण्याचे संकेत दिले आहेत.(Mim hint to join Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीकडून सुद्धा एमआयएमलासोबत घेण्याची दाट शक्यता आहे. सन्मान जनक जागा मिळणार असतील तर आम्ही महाविकास आघाडीसोबत जाऊ, असं एमआयएमचं म्हणणं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही आघाडी होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं 31 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना महाविकास आघाडी अधिक तयारीत असल्याचं दिसतं आहे. यासाठी इतर मित्रपक्षांना सोबत घेण्याच्या तयारीत महाविकास आघाडी असल्याचं दिसत आहे.
एमआयएम महाविकास आघाडीत येण्याची शक्यता आहे. एमआयएमला मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे. त्याचा फायदा महाविकास आघडीला होऊ शकतो.(Mim will Benefit Mahavikas Aghadi) शिवाय लोकसभा निवडणुकीत एमआयएमने छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढली होती. मात्र तिथे एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा पराभव झाला. अशातच जर महाविकास आघाडीसोबत एमआयएम पक्ष आला तर त्यांनाही या निवडणुकीत फायदा होऊ शकतो. मात्र जागावाटपात कुणाला किती जागा मिळणार? यावर एमआयएम आणि मविआची आघाडी होणार की नाही? हे अवलंबून असेल.