Monday, November 18, 2024

Latest Posts

तर मी राजीनामा देऊन निवृत्ती घेईल…असे का म्हणालेत फडणवीस

| TOR News Network |

Devendra Fadnavis Latest News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर बालताना एक मोठे विधान केले आहे. त्यांना मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगें पाटील यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांना उत्तर दिलं आहे.(Fadnavis On Maratha Reservation) यात फडणवीसांनी थेट आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन निवृत्ती घेतो असा स्पष्ट इशारा दिला आहे. (Fadnavis on Resign) या वक्तव्यामुळे त्यांनी एका प्रकारे मराठा आरक्षणाचा चेंडू मुख्यमंत्रा एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात टाकला आहे.

काल मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक झाली. पुणे जिल्ह्यातील दौंडच्या विविध प्रकल्प आणि योजनांसंबंधी बैठक झाली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं.(Fadnavis to Media)

मला याची कल्पना आहे की, मनोज जरांगे पाटील यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात.(DCM Fadnavis on Cm Eknath Shinde) इतर सगळे मंत्री हे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारांवर काम करत असतात. एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम करतो. त्यामुळे मी त्याच्या पुढे जाऊन सांगू इच्छितो की, एकनाथ शिंदे यांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदे यांना विचारावीत, असं फडणवीस म्हणाले.

जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलं की, मराठा आरक्षणासंदर्भात कुठलाही निर्णय घ्यायचा प्रयत्न त्यांनी केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी मी माझ्या पदाचाही राजीनामा देईन आणि राजकारणातून देखील निवृत्त होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

तुम्ही राज्याचे कर्ते आहात. तुम्ही मराठा समाजाचं आरक्षण रोखलं आहे हे सत्य आहे, तुम्ही ते आरक्षण द्या ना… सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी तुम्ही रोखली आहे. ते तुम्ही नाकारून चालणार नाही, असं मनोज जरांगे म्हणालेत.(Jarange Patil on DCM Fadnavis)

देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याबाबत विधान केल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. त्यांना मराठा विरोधी म्हणणं चूक आहे, असं ते म्हणाले.(Cm Eknath Shinde On DCM Devendra Fadnavis)

Latest Posts

Don't Miss