| TOR News Network |
Ajit Pawar Latest News : विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात अजून तिकीट वाटप झालेले नाही. (Vidhansabha Election Latest News ) उमेदवार देखील ठरले नाहीत. सर्व पक्षांकडून प्रत्येक विधानसभा क्षेत्राची केवळ चाचपणी सुरु आहे. महाविकीस आघाडी आणि महायुतीच्या जरी बैठाका होत असल्या तरी मात्र कोणत्या मतदार क्षेत्रात कोणता उमेदवार द्यायचा या संदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही. अशात मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरचा उमेदवार घोषित केला आहे.(Ajit Pawar Declared candidate for kolhapur)
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे. त्यापूर्वी राज्यातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून दौरे आणि बैठकांचे सत्र वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांची जनसन्मान यात्रा (Ajit Pawar Jansanman yatra) सुरु आहे तर शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे.( sharad Pawar Shiv Swaraj Yatra) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुलाबी जॅकेटसह प्रचार सुरु केला आहे.(Ajit Pawar Pink Jacket) लोकसभा निवडणूकीमध्ये मोठा फटका बसल्यानंतर आता अजित पवार विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी जिल्ह्याचा आढावा घेताना अजित पवार यांनी थेट कोल्हापूरमधील विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवाराचे नाव घोषित केले आहे.
अजित पवार हे कोल्हापूरमध्ये होते. यावेळी त्यांनी जिल्ह्याची पाहणी केली. तसेच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा आढावा देखील घेतला आहे. यावेळी अजित पवार यांनी कोल्हापूरमधील एका उमेदवाराचे नाव देखील स्पष्ट केले आहे. कागल विधानसभा मतदारसंघामधून हसन मुश्रीफ निवडणूक लढवतील, असे अजित पवार यांनी जाहीर केले.(Hasan Mushrif For Kagal Vidhansabha) अजित पवार यांनी हसन मुश्रीफ यांचे नाव जाहीर करताच अजित पवार गटातील समर्थकांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण दिसून आले. मात्र राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. अजित पवार यांनी थेट उमेदवार जाहीर केल्यामुळे महायुमध्ये हालचाल सुरु झाली. तसेच इतर पक्षांतीव इच्छुकांची नाराजी समोर येत असल्याचे बोलले जात आहे.
कोल्हापूरचा कागल विधानसभा मतदारसंघ नेहमीच राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा राहिला आहे. कागलमध्ये नेहमीच राजकीय समीकरण आणि चुरशीची लढत झालेली दिसून आली आहे. यापूर्वीच्या विधानसभा निवडणूक 2019 ला भाजपने समरजित घाटगे यांचे तिकीट नाकारले होते. त्यामुळे भाजपमध्ये बंडखोरी झाली. घाटगे यांनी अपक्ष निवडणूक लढली होती. पण 2019 ला त्यांना यश मिळालं नाही. यावेळी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ विजयी झाले होते. पुन्हा यंदाच्या निवडणूकीला देखील समरजित घाटगे लढण्यास इच्छुक आहेत. भाजपकडून तिकिट मिळावं अन् महायुतचे अधिकृत उमेदवार होण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मात्र अजित पवारांनी थेट मुश्रीफांचं नाव जाहीर केल्याने पुन्हा एकदा समरजित घाटगे यांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. हसन मुश्रीफ हे सध्या अजित पवार यांच्यासोबत असून ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत.