Sunday, November 17, 2024

Latest Posts

सचिन वाझे यांचे अनिल देशमुखांवर गंभिर आरोप

| TOR News Network |

Sachin Waze Latest News : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहात बंद आहे. त्याला रात्री वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात आणलं होतं. (Sachin Waze Sensational claim) त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्याने खळबळजनक दावा केला आहे.त्याने परत एकदा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभिर आरोप केले आहेत. (waze Serious charge on anil deshmukh ) विशेष म्हणजे नुकतेच अनिल देशमुख यांनी भाजपा नेते व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तेव्हा पासून हे प्रकरण प्रकाश झोतात आले आहे. (Sachin waze on Anil Deshmukh)

सचिन वाझे याने खळबळ उडवून दिली आहे. त्याने नवीन धक्कादायक आरोप केले आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसात महाराष्ट्रातील राजकारण आणखी तापणार आहे.(Maharashtra Politics Latest news) महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगणार आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अलीकडेच राज्याचे गृहमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते.(Anil Deshmukh Blame DCM Fadnavis ) त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं. आता सचिन वाझेने पुन्हा एकदा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरच आरोप केले आहेत.

“जे काही झालं, त्याचे पुरावे आहेत. अनिल देशमुखांपर्यंत त्यांच्या पीए मार्फत पैसे जायचे. सीबीआयकडे याचे पुरावे आहेत. मी स्वत: देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याची माहिती दिलीय. (Sachin vaze on DCM Fadnavis) मी सर्व पुरावे दिले आहेत. मी नार्को चाचणीसाठी सुद्धा तयार आहे. मी त्या पत्रात सर्व काही लिहिलं आहे. मी जयंत पाटील यांचं सुद्धा नाव दिलय” असं सचिन वाझेने एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

सचिन वाझे मुंबई पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी आहे. 100 कोटी रुपयाच्या खंडणी प्रकरणात तो आरोपी आहे. त्याशिवाय 2021 मध्ये अँटिलायबाहेर बॉम्ब ठेवणं आणि मन्सुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी आहे. आपण गृहमंत्री असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी ऑफर दिली होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी काही दिवसांपूर्वी केला. (Anil Deshmukh on Devendra Fadnavis)अनिल देशमुखांनी फडणवीसांबाबत पुरावे दिले, तर पुढच्या 3 तासात त्यांचा पदार्फाश करु असं आव्हान चित्र वाघ यांनी अनिल देशमुखांना दिलं होतं.

Latest Posts

Don't Miss