Monday, November 18, 2024

Latest Posts

दिंडोरी मतदारसंघात बाप विरुद्ध बेटा

| TOR News Network |

Ajit Pawar NCP LAtest News :  राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवाळांची उमेदवारी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी जाहीर केली आहे. (Narhari zirwal to contest vidhansabha from dhindori) तर मुलगा गोकुळ झिरवळ हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आपले वडिल नरहरी झिरवाळांना आव्हान देणार आहे. (Gokul zirwal to fight against Father) यामुळे दिंडोरी मतदारसंघात बाप विरुद्ध बेटा असा सामना रंगणार आहे. (Narhari Zirwal VS Gokul Zirwal )

नाशिकच्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघात झिरवाळ पिता-पुत्रांमध्येच सामना रंगण्याची शक्यता निर्माण झालीय. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दिंडोरीतून नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी देण्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केली. (Sunil Tatkare Declared Narhari zirwal from dhindori) विशेष म्हणजे महायुतीत जागावाटपाची चर्चा सुरू होण्याआधीच ही उमेदवारी परस्पर जाहीर करण्यात आली..

एकीकडे अजित पवार गटाकडून नरहरी झिरवाळांची उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. तर दुसरीकडे त्यांचे पुत्र गोकुळ झिरवाळही विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.. काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवलीय.. वेळ पडली तर वडिलांविरोधातही उभं राहण्याची तयारी गोकुळ झिरवाळांनी केलीय..(Gokul Zirwal ready to fight against Father)

महाराष्ट्राच्या राजकारणात काका विरूद्ध पुतण्या, भाऊ विरुद्ध भाऊ, नणंद विरुद्ध भावजय, भाऊ विरुद्ध बहिण अशा एक ना अनेक लढती आतापर्यंत आपण पाहिलेत.. जर खरंच गोकुळ झिरवाळ दिंडोरीच्या रिंगणात उतरले तर आगामी विधानसभेत आपल्याला बाप विरुद्ध बेटा असा सामनाही पाहायला मिळू शकतो..

Latest Posts

Don't Miss