| TOR News Network |
Train Accident Latest News : हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेस ट्रेनचा भीषण अपघात झाला आहे. (Howrah Mumbai Train Accident) हावडा-मुंबई मेल एक्सप्रेस (१२८१०) रुळावरून घसरली. या रेल्वेचे सर्व डब्बे रुळावरून घसरून एक मालगाडीला धडकले. या अपघातात तीन जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत.(3 Died in Mail Train Accident ) घटनास्थळी बचाव पथक पोहचले आहे.(Rescue Operation going on) जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात राजखरसवां वेस्ट आऊट आणि बाराबम्बो दरम्यान झाला. हावडा-मुंबई मेल एक्सप्रेस (१२८१०) हीचे १८ डब्बे रुळावरुन घसरले. भल्या पहाटे ३:४५ मिनिटांनी हा अपघात झाला.(Howrah Mumbai Mail Early Morning Accident) दक्षिण-पूर्व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे अनेक डब्बे रुळावरुन उतले आहेत. जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. तर काहींना चक्रधरपूर येथे हलविण्यात आले आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत ३ जणांच्या मृत्यूची माहिती मिळत आहे. (3 Died in Howrah Mumbai mail Accident) तर १५० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे समोर येत आहे. (150 passenger injured) याविषयीची अद्ययावत माहिती लवकरच समोर येईल. पण चालकाच्या प्रसंगावधानाने अनेकांचे प्राण वाचल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. या अपघाताची जाणीव होताच चालकाने रेल्वेचा वेग कमी केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नाहीतर आज मृतांचा आकडा मोठा असता. चक्रधरपूर रेल्वे मंडळात याविषयीचा अलर्ट मिळाल्याने एकच गोंधळ उडाला.
या अपघातानंतर या मार्गावरील हावडा टिटलागडसह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. (Many Train Cancelled on this route) चक्रधरपूर येथील रेल्वे रुग्णालयासोबतच टीएमएच, मेडिकल कॉलेज आणि जमशेदपूरच्या सदर हॉस्पिटललाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मालगाडीला धडक मिळालेल्या माहितीनुसार, हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेसच्या काही बोगी रुळावरून घसरल्या आणि जवळच उभ्या असलेल्या मालगाडीला धडकल्या. या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याच्या वृत्ताला रेल्वे अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. जखमींना चक्रधरपूर येथील रेल्वे रुग्णालयात आणण्यात येत आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर आहेत.