| TOR News Network |
Maharashtra Rain Alert News : मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. कोकणात पाऊस थोडा ओसरला असला तरी घाटमाथ्यावर अद्यापही मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळं कोल्हापूर-सांगली परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. (Flood Situation in Kolhapur)पुण्या मुंबईत पाऊस सुरु असून त्यामुळे जन जीवन विस्कळीत झाले आहे.तर विदर्भात देखील अनेक ठिकाणी पाऊस कोसळत असून नागपूरातही पावसाची संततधाक सुरु आहे. (Rain in Vidharbha Region)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात येत्या 4-5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. (Rain fall in maharashtra for next 4-5 days) पुण्यासह घाट परिसरात मुसळधार पाऊस बरसू शकतो. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा घाट माथ्यासाठी देण्यात आला आहे. तर, सामान्य स्वरुपाचा पाऊस राज्यातील इतर जिल्ह्यांत होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोल्हापूरला यलो अलर्ट देण्यात आला आहे तर, साताऱ्याला आजसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Satara,kolhapur rain Alert)
कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर बनत चालली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या 24 तासात तब्बल 3 फुटांनी वाढली आहे. त्यामुळे नदी काठच्या सखल भागात पुराचे पाणी घुसले आहे.
नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसाने वीर धरणातून सोडलेले पाणी आज मध्यरात्री पंढरपूर मध्ये दाखल झाले आहे. यामुळे चंद्रभागा नदी दुधडी भरून वाहू लागलेली आहे चंद्रभागा त्याच्या वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह इतर सर्व मंदिरांना पाण्याने वेढा टाकलेला आहे नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे नदीच्या पाण्यात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने भाविकांना केलेला आहे.
नागपूरात देखील गेल्या पाच – सात दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे.गडचिरोली,वर्धा, चंद्रपूर, अमरावतीत चांगला पाऊत पडत आहे.नागपूरात शुक्रवारपासून पावसाची रिपरिप सुरु आहे.हवामान खात्याने नागपूरला यलो अलर्ट दिला आहे. (yellow alert to nagpur)
रायगड – ऑरेंज, सिंधुदुर्ग – ऑरेंज, रत्नागिरी – ऑरेंज, ठाणे – यलो, मुंबई – यलो, पुणे – ऑरेंज, सातारा – ऑरेंज,चंद्रपूर – ऑरेंज ,गडचिरोली -ऑरेंज ,गोंदीया – ऑरेंज ,नागपूर – यलो