Monday, November 18, 2024

Latest Posts

सरकारकडून लाडक्या बहिण भावात भेदभाव

| TOR News Network |

Sanjay Raut Latest News : सध्या सरकार वर ८ लाख कोटींच कर्ज आहे. (8 Lakh Loan On Maha Gov) अशात विघानसभा निवडणूका डोळ्या समोर ठेऊन सरकार नव्या योजना जाहीर करत आहे. यात लाडकी बहिण योजना सुरु केली.(Ladki Bahin Yojana) आता लाडका भाऊ आणला. (Sanjay Raut On Ladka Bhau Yojana) लाडक्या भावांना ६ हजार आणि १० हजार रुपये देणार, आणि लाडक्या बहिणीला फक्त 1500 रुपये ? लाडक्या बहिणीला पण १० हजार रुपये द्या, तरच त्याचं घर चालेल.(Sanjay Raut On Ladki Bahin Yojana) 1500 रुपयांमध्ये लाडक्या बहिणीचं घर चालणार कसं? हा तर भेदभाव आहे अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारच्या योजनांवर कडाडून टीका केली.(Sanjay Raut On Ladki Bahin Yogana)

खरी गरज लाडक्या बहिणींना आहे. त्या घर चालवतात.(Ladki Bahin Runs Home) अनेकींच्या घरात नवरा,भाऊ बेरोजगार, नोकऱ्या नाहीत. आज एअर इंडियाच्या कार्यालयासमोर 2000 लोडरच्या जागा भरण्यासाठी 25000 सुशिक्षित तरुणांची झुंबड उडाली या महाराष्ट्राची स्थिती आहे,  हे सगळे लाडके भाऊ आहेत. त्यानाही दहा- दहा हजार रुपये द्या आणि लाडक्या बहिणीच्या खात्यात सुद्धा दहा हजार रुपये टाका पंधराशे रुपयांनी काय होतं, (Pay ten Thousand to Ladki Bahin) पंधराशे रुपयात मुख्यमंत्र्यांचे घर चालेल का ? असा सवाल राऊत यांनी विचारला. लाडक्या बहिणीवर अन्याय का करता ? आमची भूमिका आहे. लाडक्या बहिणीलाही दहा हजार रुपये द्या, लाडक्या भावाला ही दहा हजार रुपये द्या आणि स्त्री पुरुष समानता महाराष्ट्रात आहे, हे दाखवून द्या, असं राऊत म्हणाले.

शरद पवार हे सर्वात मोठे नटसम्राट आहेत तर छगन भुजबळ फिरत्या रंगमंचावरील कलाकार आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.(Sanjay Raut On Chhagan Bhujbal) छगन भुजबळ हे खूप मोठे कलाकार आहेत, त्यांनी चित्रपटात देखील काम केलेलं आहे.(Chhagan Bhujbal is Big Artist) खूप वेळा आपलं रंग रूप बदलून एक नाट्य निर्माण करण्यात छगन भुजबळ माहीर आहेत. छगन भुजबळ का गेले,कशासाठी गेले,त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कसा हंगामा झाला हे सर्वांना माहित आहे.

लोकसभा निवडणुकीत आम्हाला दहा जागा सुद्धा मिळणार नाही हे महायुती म्हणत होती पण आम्ही 31 जागा जिंकल्या आहेत. तर चार जागा आम्ही खूप कमी मतांनी हरलो,विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडी 280 जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(Sanjay Raut On Vidhansabha)

Latest Posts

Don't Miss