| TOR News Network |
Cabinet expansion Latest News : महाराष्ट्र सरकार मध्ये लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आणि महायुती मधील इच्छुक आमदारांना त्यात संधी देणार अशा चर्चा सुरु होत्या. (Maharashtra cabinet Expansion ) मात्र आता या संदर्भात दिल्ली भाजपमधील वरिष्ठ नेत्यांकडून एक मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.(Big Decision on Cabinet Expansion) महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार नाही असे सांगण्यात आले आहे. (No Cabinet Expansion) त्यामुळे महायुतीतील अनेक इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
राज्यात शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांचे सरकार सत्तेत आहे. जेव्हा हे सरकार स्थापन झाले तेव्हापासून अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे दिसत होते. (Many Mla Willing For Cabinet minister) असे असताना राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडल्यानंतर विस्तार केला जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार, मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गट, अजित पवार गटाकडून कोणत्या आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.(Mla Eye On Cabinet Expansion) मात्र, आता हा मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार नसल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार नाही, असा निर्णय थेट दिल्लीतून घेण्यात आला आहे. (No Cabinet Expansion Message From Delhi) त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या अनेक आमदारांचे स्वप्न भंगलं आहे. जरी मंत्रिमंडळ विस्तार होणार नसला तरी येत्या काही दिवसात खाते बदल होण्याची शक्यता मात्र वर्तवली जात आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. (Minister’s Profile will Change Soon)
गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या महामंडळाच्या नियुक्ताही यावेळी केल्या जातील असं बोललं जात होतं. मात्र, भाजप हायकमांडने महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार करण्यास नकार दिला आहे. (BJP High Command Decision) त्यामुळे या रखडलेल्या नियुक्त्या केव्हा होणार हादेखील आता प्रश्न निर्माण झाला आहे.