Monday, November 18, 2024

Latest Posts

शिंदे गट भाजपचे दोन आमदार रोखणार : अंतगर्त कलह चव्हाट्यावर

| TOR News Network |

Navi Mumbai Bjp Latest News : नवी मुंबईमधील दोन विधानसभा मतदारसंघावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांनी आपला दावा केला आहे.(Shinde Group Claim 2 mla seats vs bjp) विशेष म्हणजे या दोन्ही मतदार संघात भाजपचे आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत.(Upcoming Vidhansabha News) अद्याप जागावाटपाची बोलणीही सुरु झालेली नाही. अशातच शिंदे गटाच्या नेत्यांनी भाजप आमदार नको अशी भूमिका घेतल्याने नवी मुंबईत शिंदे गट आणि भाजपाचा अंतगर्त कलह चव्हाट्यावर आला आहे. (Shinde leader vs Bjp) नवी मुंबई येथे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटण विधानसभा रहिवाशांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यातूनच ही मागणी पुढे आली आहे.

नवी मुंबईमध्ये बेलापूर आणि ऐरोली असे विधानसभा मतदारसंघ आहेत. बेलापूर विधानसभा मतदारसंघात मंदा म्हात्रे या भाजपच्या विद्यमान आमदार आहेत.(Manda Mahatre belapur MLA) मंदा म्हात्रे यांच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी दावा केला आहे. बेलापूरमधून मला उमेदवारी मिळावी अशी माझी मागणी आहे. शेवटी पक्षाचे नेते आमचा निर्णय घेतील. यापूर्वीही मी निवडणुकीच्या रिंगणात होतो असे त्यांनी म्हटले आहे.

नवी मुंबईतील ऐरोली या विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे गणेश नाईक आमदार आहेत.(Ganesh Naik Bjp MLA) या जागेवरही शिंदे गटाचे उपनेते आणि जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी आपला दावा सांगितला आहे. पाटण विधानसभेअंतर्गत आज मेळावा होता. याचा आम्हाला आनंद वाटला. आम्ही नक्कीच खूप चांगले काम करत आहे. ऐरोलीमधून मला उमेदवारी मिळावी, अशी मागणी विजय चौगुले यांनी केली आहे.

शिंदे गटाचे नेते विजय चौगुले आणि विजय नाहटा यांच्या या दाव्यामुळे विद्यमान आमदार मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांचे तिकीट कापले जाणार का याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, राज्य उत्पादन शुक्ल मंत्री शंभूराज देसाई यांनी ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघात खेळीमेळीने जागावाटप होईल. (Shamburaj desai on seat sharing) शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला चांगला वाटा मिळेल. त्यात नवी मुंबईही मिळेल असे विधान करून रंगत आणली आहे.

Latest Posts

Don't Miss