Monday, November 18, 2024

Latest Posts

विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट : हा नवा उमेदवार रिंगणात

| TOR News Network |

Vidhan Parishad Latest News : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान आणि मतमोजणी पार पडणार आहे. विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत असताना महाविकास आघाडीने नवा डाव खेळला आहे.(New Game Of Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) विधानपरिषद निवडणूक लढू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.त्यामुळे विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले तर निवडणूक अटळ असेल.

महाविकास आघाडीकडून मिलिंद नार्वेकर मंगळवारी (2 जुलै) सकाळी आदित्य ठाकरे आणि काही आमदारांच्या उपस्थितीत आपला अर्ज दाखल करणार आहेत.(Narverkar to fill form for vidhan parishad) ठाकरे गटाच्या आमदारांनी विधान भवनातून त्यांचा अर्ज घेतल्याची देखील माहिती समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडे 15 आमदार आहेत, तर विजयासाठी 23 आमदारांचा कोटा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील आमदारांच्या मदतीने ते आमदार होऊ शकतात, अशी रणनीती महाविकास आघाडीने आखली आहे.(Mahavikas strategy For Vidhanparishad)

काँग्रेसकडून डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांना उमेवारी जाहीर केली आहे. (Pradnya Satav from congress)काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी डॉ. सातव यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर शेकापच्या जयंत पाटील यांना देखील उमेदवारी जाहीर झाली आहे.

भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेसाठी 5 जणांची यादी जाहीर केली आहे.(Bjp 5 candidate for vidhan parishad) माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडेंसह परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर आणि सदाभाऊ खोत यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर महिनाभरातच भाजपानं त्यांना विधानपरिषदेवर संधी दिलीय. तर एकनाथ शिंदे शिवसेना आणि एनसीपी अजित पवार प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात असणार आहेत.

Latest Posts

Don't Miss