| TOR News Network |
Sunetra Pawar Latest News: राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्यसभेवर बिनविरोध निवडून जात आहेत. (Sunetra Pawar On Rajyasabha) त्यांना राज्यसभेवर पाठवल्यानंतर पक्षात नाराजीनाट्य रंगल्याची चर्चा होती.विशेष म्हणजे ओबीसी नेते आणि पक्षातील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी स्वत: राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रात मंत्रिपद नाकरले होते. राज्यमंत्रीऐवजी कॅबिनेट मंत्री करण्याची मागणी राष्ट्रवादीची होती. (Ncp Ask For Cabinet) त्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे स्पर्धेत आहेत. आता त्यामध्ये सुनेत्रा पवार यांचे नाव आले. त्यांनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात स्पष्टपणे सांगितले. (Sunetra Pawar On Media)
बारामती माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार यांनी सांगितली की, केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळाल्यास मला आनंद होईल.(Sunetra Pawar On Cabinet) या संधीचा पूर्ण फायदा घेत सोने करेल. आता बारामतीमध्ये झालेल्या पराभवाचे विश्लेषण आम्ही करत आहोत.(Sunetra Pawar on Loksabha Defeat) पराभवाच्या कारणांवर आत्मचिंतन करत आहोत. त्यानंतर सुधारणांसाठी पावले उचलण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकसभेत एकच खासदार निवडून आला. त्यामुळे मोदी 3.0 सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार देण्यात येत होते. परंतु राष्ट्रवादीची कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी होती. प्रफुल्ल पटेल यापूर्वी कॅबिनेट मंत्री होते, आता राज्यमंत्री होणे योग्य नसल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. आम्ही थांबण्यास तयार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले होते. त्याचवेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरु असल्याची बातमी आली होती. (Prafull Patel,Sunil Tatkare in Race For Cabinet) आता त्यात सुनेत्रा पवार यांची भर पडणार आहे. त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य निर्माण होण्याची शक्यता आहे.
सुनेत्रा पवार अजून मंत्री झाल्या नाहीत. परंतु बारामतीमध्ये भावी केंद्रीय मंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचे बॅनर लागले आहे.(Sunetra Pawar Banner In Baramati) श्रीकांत जाधव मित्र परिवाराकडून बारामती शहरात भावी केंद्रीय मंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचे बॅनर लावण्यात आले आहे.