Sunday, November 17, 2024

Latest Posts

त्यांचे सोबत असलेले आमदार ब्रम्हदेव आला तरी कायम राहणार नाहीत

| TOR News Network |

Rohit Pawar Latest News : आमदार रोहित पवार यांनी नुकतेच आपले काका व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी आपल्या काकू सुनेत्रा पवार यांच्यावरही भाष्य केले.सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड होताच रोहित यांनी त्यांचे अभिनंदन केलंय. (Rohit Pawar On Sunetra Pawar) पण, त्याचवेळी काका अजित पवार यांना टोला लगावलाय.(Rohit Pawar on ajit pawar)

रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांचं अभिनंदन करताना अजित पवार यांना टोला लागवण्याची संधी सोडली नाही. ‘माझ्या काकी म्हणून त्यांचे अभिनंदन करतो त्या खासदार झाल्या आहेत. अजित पवार मला नौटंकी म्हणतात. त्यांचे 18 आमदार आमच्या संपर्कात आहेत. (Ncp 18 mla in touch with us) त्यांच्या पक्षतील लोकं अस्वस्थ आहेत.(Ncp Mla Restless) त्यांचे सोबत असलेले आमदार ब्रम्हदेव आला तरी कायम राहणार नाहीत.(Rohit Pawar On Ajit Pawar Group mla) त्यामुळे सुनेत्रा काकींना उमेदवारी दिली, त्यांचे अभिनंदन करतो.

मुलगा किंवा बायको सोडून जाणार नाही याची खात्री दादांना असावी म्हणून त्यांना घरात उमेदवारी दिली. शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली अजित दादांनी विकास केला.  उद्या आपले आमदार आणि नेते जे आपल्याबरोबर आज आहेत.ते दादांबरोबर ते बरोबर राहतीलच असं नाही. पुढच्या सहा वर्षासाठी कुठलं तरी पद आपल्याबरोबर असावं या दृष्टिकोनातून दादांनी कदाचित ते केलं असावं, असा टोला रोहित पवारांनी लगावला.(Rohit Pawar Slams Ajit Pawar)

सुनेत्रा पवारांना तुमच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. (Rohit Pawar Congrats Sunetra Pawar) आता कालच अ‍ॅडव्हान्समध्ये शुभेच्छादिलेल्या आहेत. माझं त्यांच्याशी बोलणं झालं नाही. बोलणं होईल असं वाट नाही. तुमच्या माध्यमातून फक्त शुभेच्छा आणि भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवतो, असं त्यांनी सांगितलं.

पंधरा-वीस दिवसानंतर आपल्याला महायुतीत दिसेल असं वाटत नाही. बजेट करतील निधी हा दिला जाईल आणि त्यानंतर कदाचित तिन्ही पक्ष त्यांचे वेगळे होतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. (Rohit Pawar On Mahayuti) भाजपा विधानसभेला 200 जागा लढणार आहे. एकनाथ शिंदेंना 30, अजित पवारांना 20 आणि बाकी जागा उर्वरित पक्षांना दिल्या जातील, त्यामुळे महायुती टिकणार नाही, असा दावा रोहित पवारांनी केला.

बारामतीमध्ये युगेंद्र पवारांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केलीय त्याबाबतचा अंतिम निर्णय शरद पवार घेतील. (Rohit Pawar On yugendra pawar) जयंत पाटील आणि माझ्यात कोणताही वाद नाही. आम्हाला आमच्या जागा वाढवायच्या आहेत, असं स्पष्टीकरण रोहित पवारांनी दिलं.

Latest Posts

Don't Miss