| TOR News Network |
Jammu kashmir Terrorist Attack Latest News : जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात बुधवारी पहाटे दहशतवाद्यांने हल्ला केला. (Terrorist Attack in Jammu kashmir) या हल्ल्यात सैन्यदलाचे पाच जवान आणि एक विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) असे सहा जण जखमी झाले आहेत. (6 army men injured) दहशतवाद्यांनी आज पहाटे 1:45 वाजता डोडा येथील चत्तरगल्ला भागात सैन्यदल आणि स्थानिक पोलिसांच्या चौकीवर हल्ला केला. (Terrorist attack early morning in jammu) सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांवर गोळीबार केला. दहशतवाद्यांना पकडण्याकरिता शोधमोहिम सुरू आहे. गेल्या 48 तासांत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी उच्छाद मांडला आहे. या दोन दिवसांत दहशतवाद्यांनी तीन हल्ले केले आहेत.(3 terrorist attack in last 48 hours) सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याला टिपले. काही भागात चकमक सुरु आहे.
डोडा जिल्ह्यात दहशतवाद पसरविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गेल्या 48 तासांत 3 हल्ले करण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी पोलीस चौक्या, ग्रामीण भागातील नागरीक आणि पर्यटकांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला आहे. (Terrorist targeted tourist in jammu kashmir)डोडा जिल्ह्यातील काही भागात रात्रीच्यावेळी सुरक्षा दलासोबत दहशतवाद्यांची चकमक झाली. त्यात 6 जवान जखमी झाले. राष्ट्रीय रायफल युनिटचे 5 तर एसपीओचा एक जवान जखमी झाला आहे.
पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचे एडीजी आनंद जैन यांनी सांगितले. दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात एक नागरीक जखमी झाला. त्याला लागलीच सुरक्षा दलांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दहशतवाद्यांनी एका गावात पाणी मागितले.(Terrorist Ask For Water to villager) ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्यावर संशय आला. त्यांनी लागलीच त्यांची माहिती सुरक्षा यंत्रणेला दिली. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर लक्ष न देण्याचे आवाहन जैन यांनी केले आहे.
जम्मू-काश्मीरमधील रियासी येथील भाविकांच्या, यात्रा बसवर नुकताच हल्ला करण्यात आला. यातील एका दहशतवाद्याचे रेखाचित्र, स्केच तयार करण्यात आले आहे. (Sketch released of terrorist) हे रेखाचित्र प्रत्यक्षदर्शींच्या जबाबानंतर तयार करण्यात आले आहे. पोलिसांनी या दहशतवाद्याची माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. (20 lakh prize mony on terrorist) हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांना टिपण्यासाठी सुरक्षा दलाची 11 पथके तयार करण्यात आली आहे.(11 squad in search operation) 9 जून रोजी दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. त्यात 9 भाविकांचा मृत्यू झाला. तर 40 हून अधिक जण जखमी झाले. या सर्व प्रकरणानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने संताप व्यक्त केला आहे. त्यांनी दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे.