| TOR News Network |
Sanjay Sirsat Latest News : छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे लोकसभा निवडणूक जिंकलेत. (sandipan bhumre Mp From Sambhaji Nagar) त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री व मंत्रीपदाची जागा आता रिक्त झाली आहे. त्यामुळे गेल्यावेळी मंत्रीपदाची हुकलेली संधी आता शिरसाट यांना मिळणार अशी शक्यता वर्तवली जात असून या संदर्भात आता त्यांचा मार्ग देखील मोकळा झाला आहे.(Sanjay Sirsat To get ministry) एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर ठाकरे सेनेवर आमदार संजय शिरसाट यांनी आक्रमकपणे हल्लाबोल केला.(Sanjay Sirsat Aggressive in Shinde Sena) त्यांना मंत्रीपद मिळेल, अशी शक्यता असताना संदीपान भुमरे यांना संधी देण्यात आली. मात्र भुमरे खासदार झाल्यानं शेवटचे काही महिने का होईना, संजय शिरसाट यांना एक संधी निर्माण झाली आहे. (Sanjay Sirsat Have chance To get ministry)
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघात महायुतीचे संदीपान भुमरे यांनी आश्चर्यकारक विजय मिळवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर, शिवसेनेच्या पारंपरिक जागांवर त्यांनी दावा करत ठाकरे यांच्या गटाच्या विरोधात शिवसेनेनं निवडणूक लढवली. त्यात छत्रपती संभाजीनगर ही जागा प्रतिष्ठेची मानली गेली. जिल्ह्यातील पाच आमदारांनी ठाकरे ऐवजी एकनाथ शिंदे यांना साथ दिली.(Sambhaji nagar MLA News) त्यावेळी महत्वाची भूमिका पार पाडली, ती पश्चिम मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट यांनी. त्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळेल, अशी शक्यता होती. मात्र युतीमध्ये तीन मंत्रिपदं जिल्ह्याला मिळाले. त्यात पैठणचे आमदार संदीपान भुमरे, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, पूर्वचे आमदार अतुल सावे यांची वर्णी लागली. या मंत्रिमंडळात मंत्री होण्याची संधी मिळणार नाही, असं वाटत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे खासदार झाल्यानं संजय शिरसाट यांचा मंत्री होण्याचा मार्ग मोकळा झालाय. पण याबाबत बोलताना “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, त्यानुसार आम्ही काम करू,” असं आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलं.(Sanjay Sirsat On Sambhaji Nagar ministry)
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी संभाजीनगर जिल्ह्याचं पालकमंत्री पद त्यांच्या पक्षाकडं राखून ठेवलं. त्यानंतर संदीपान भुमरे यांना कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री पद देण्यात आलं. त्यावेळी मंत्रिपदासाठी आमदार शिरसाट यांनी आपली शक्ती पणाला लावली. मात्र त्यांना पक्षाचं प्रवक्ते पद देण्यात आलं.(Sanjay Sirsat Spokeperson for Shinde Sena) भुमरे खासदार पदी गेल्यावर आता शिरसाट यांच्या मंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला असून त्यांना पालकमंत्री पद देखील मिळेल, अशी चर्चा सुरू झाली. मात्र त्याला भाजपाचा खोडा लागण्याची शक्यता आहे.