Monday, November 18, 2024

Latest Posts

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश

४८ पैकी ३० जागा मिळणार असल्याचा कल

Lok Sabha Result Latest News : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात सर्वात जास्त फटका बसताना दिसत आहे. महाराष्ट्रात 45+ ची घोषणा करणाऱ्या महायुतीला केवळ 17 जागा मिळताना दिसत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला 30 जागांवर विजय मिळत असल्याचे कलावरुन स्पष्ट होत आहे. (Mahavikas aghadi 30 seats )या निवडणुकीत कलावरुन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. 2019 मध्ये भाजपने 23 जागांवर आणि शिवसेनेने 18 (शिवसेना एकत्र होती) जागांवर विजय मिळवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने 5 जागांवर तर काँग्रेस आणि एमआयएमचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांची जोरदार कामगिरी झालेली दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला राज्यात 30 जागा मिळत आहेत. या निवडणुकीत सर्वाधिक फटका भाजपला बसताना दिसत आहे.

नितीन गडकरी आघाडीवर

देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागपूर मतदारसंघाकडे (Nagpur Lok Sabha Election Result 2024) राज्यासह अवघा देशाचे लक्ष लागले आहे. त्यामागील कारण म्हणजे भाजपचे हेवीवेट नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रणांगणात उतरले होते. नितीन गडकरींनी गेल्या काही वर्षांच्या कार्यकाळात नागपूरसह देशभरात केलेल्या चांगल्या आणि वेगळ्या विकासकामामुळे देश पातळीवर त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला. शिवाय याच विकासकामांच्या जोरावर आपण मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ, असा विश्वासही नितीन गडकरींनी वेळो वेळी बोलून दाखवला आहे. आज आता निकालाचा कल पुढे येत आहे.नागपूरातून नितीन गडकरी हे आघाडीवर आहेत.त्यांना १० व्या फेरी अंती 63,209 मतांनी आघाडी मिळवली आहे. नितीन गडकरी यांना एकूण 3,63,139 मते मिळाली आहेत तर विकास ठाकरे यांना 2,99,930 मिळाली आहेत.त्यामुळे नितीन गडकरी यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Latest Posts

Don't Miss