| TOR News Network |
Ajit Pawar Latest News : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (Anjali Damania On Ajit Pawar) अग्रवाल कुटुंबाला वाचवण्यासाठी अजित पवारांनी फोन केले, असा आरोप करून अंजली दमानियांनी खळबळ उडवून दिली आहे.(Ajit Pawar Pressure on cp ) अजित पवारांची नार्को टेस्ट करा, त्यांचा फोनही चेक करा, अशी मागणी अंजली दमानियांनी केली होती. (Anjali Damania Demands narco test)त्यांचे हे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले. मात्र, या वादात आता अंजली दमानिया यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनाच इशारा दिला आहे.(Damania Warned Cp Amitesh kumar)
अंजली दमानियांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. पुणे कार अपघातातील आरोपींना वाचवण्यासाठी अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केले, असा खळबळजनक आरोप दमानियांनी केला. (Ajit Pawar in pune accident case) विशेष म्हणजे अजित पवारांनीही दमानियांचं हे चॅलेंज तत्काळ स्वीकारलं. नार्को टेस्टला तयार आहे.(Ajit Pawar Accepted challanged) मात्र आरोप सिद्ध झाले नाहीत तर दमानियांनी संन्यास घ्यावा, असा प्रतिआव्हान अजितदादांनी दिलं. दमानियांनीही हे आव्हान लगेचच स्वीकारलं.
त्यानंतरही गप्प बसतील त्या अंजली दमानिया कुठल्या? अजित पवारांनी मल्टिपल कॉल्स का केले, हे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी उघड करावं… अन्यथा अग्रवाल कुटुंबाचे आणि अजितदादांचे काय संबंध आहेत, याचे पुरावे दोन दिवसात बाहेर काढू, असा इशाराच दमानियांनी दिला आहे.(Damania Claim Ajit Pawar Multiple call to pune cp)
पोलीस आयुक्त अमितेष कुमार यांनी पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.(Pune Cp Meet Ajit Pawar) पुणे अपघात प्रकरणाच्या तपासाची माहिती त्यांनी यावेळी अजित पवार यांना दिली. अमितेश कुमार यांनी अजित पवार यांच्या निवासस्थानी जाऊन तपासातल्या प्रगतीची माहिती दिली. गेल्या आठवड्यात अजित पवार पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या प्रकरणात कुणालाच पाठीशी घातलं जाणार नाही असं म्हटलं होतं. (No one will be excused in pune accident case says ajit pawar) त्याच प्रमाणे पोलीस आयुक्तांकडून संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतल्याचंही त्यावेळी सांगितलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी अजित पवारांना तपासाबाबत माहिती दिली.