Monday, November 18, 2024

Latest Posts

महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात प्रज्वल रेवन्नाला बंगळुरू विमानतळावर मध्यरात्री अटक

| TOR News Network |

Prajwal Revanna Latest News : अनेक महिलांचं कथित लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले जेडीएसचे निलंबित नेते प्रज्वल रेवन्ना हे बंगळुरू विमानतळावर दाखल होताच त्यांना एसआयटीनं शुक्रवारी मध्यरात्री अटक केली. (Sit Arrest Prajwal revanna)  यावेळी बंगळुरूच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष तपास पथकानं (एसआयटी) मोठा फौजफाटा तैनात केला होता. प्रज्वल रेवन्ना यांना जर्मनीतील म्युनिकहून परतल्यानंतर लगेच त्यांना सीआयडी कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आलं.(Prajwal Revanna at CID Office)

जेडीएसचे निलंबित नेते तथा खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर कथित महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केल्यानंतर ते जर्मनीला गेले होते. (Mp Prajwal Revanna Sexual Abuse Case) त्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर प्रज्वल रेवन्ना हे भारतात परतले. यावेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पथकांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर प्रज्वल रेवन्ना यांना विशेष तपास पथकाच्या ( एसआयटी ) ताब्यात देण्यात आलं. खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्याविरुद्ध न्यायालयीन वॉरंट प्रलंबित होते. औपचारिकतेनंतर एसआयटीनं प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली.

बंगळुरूच्या विमानतळावर आल्यानंतर एसआयटीनं प्रज्वल रेवन्ना यांना ताब्यात घेतलं. (Prajwal Revanna Arrested At Banglore Airport) प्रज्वल रेवन्ना यांच्यावर अनेक महिलांचं कथितरित्या लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षेमुळे लगेच दुसऱ्या मार्गानं एसआयटीनं बाहेर काढलं. प्रज्वल रेवन्ना यांनी 27 मे रोजी एक व्हिडिओ जारी करत आपण 31 मे रोजी एसआयटीसमोर हजर होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. प्रज्वल रेवन्ना हे 27 एप्रिलला जर्मनीला रवाना झाले होते. त्यानंतर सीबीआय मार्फत एसआयटीनं केलेल्या विनंतीनंतर इंटरपोलनं प्रज्वल रेवन्ना यांच्याविषयीची माहिती मागणारी ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली.(Blue Corner Notice)

जेडीएसचे निलंबित नेते प्रज्वल रेवन्ना यांच्यावर कथित लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात येत आहेत. त्यांच्या कथित लैंगिक शोषणाचे पेन ड्राईव्ह बाहेर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. त्यानंतर एसआयटीनं दाखल केलेल्या अर्जानंतर विशेष न्यायालयानं प्रज्वल रेवन्ना यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. कर्नाटक सरकारनं त्यांचा पासपोर्ट रद्द करण्याची विनंती केंद्र सरकारकडं केली. त्यामुळे केंद्र सरकारनं प्रज्वल रेवन्ना यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. केंद्र सरकारनं लैंगिक शोषणाच्या कथित आरोपावरुन कर्नाटक सरकारनं मागणी केल्यानुसार त्यांचा पासपोर्ट का रद्द करू नये, असं या नोटीसमध्ये बजावलं. मात्र प्रज्वल रेवन्ना यांनी आपल्यावरील कथित लैंगिक शोषणाचे आरोप खोटे असल्याचं स्पष्ट केलं. हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा दावा त्यांनी जारी केलेल्या व्हिडिओत केला.

Latest Posts

Don't Miss