Monday, November 18, 2024

Latest Posts

आज मुंबईत महायुतीसह महाविकास आघाडीचे जोरदार शक्तिप्रदर्शन

Theonlinereporter.com – May 17, 2024 

Mumbai Lok Sabha Latest News : शुक्रवारी महायुती आणि महाविकास आघाडीकडून मुंबईत शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.(Mahavikas aghadi,mahayuti news) इंडिया आघाडीचा भाग असलेल्या महाविकास आघाडीने शक्तीप्रदर्शनाची जय्यत तयारी केली आहे. (mahavikas aghadi mumbai rally) परंतु यामध्ये महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते असलेले राहुल गांधी उपस्थित राहणार नाही.(Rahul gandhi mahavikas aghadi mumbai news) मुंबईतील बीकेसी मैदानावर संध्याकाळी सहा वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. (Pm modi rally in mumbai) या सभेच्या निमित्ताने मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार आहेत.(Raj thackeray modi mumbai news) त्यामुळे आज मुंबईकरांना महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कडवी टक्कर पाहायला मिळणार आहे.

मुंबईत होणाऱ्या या दोन्ही सभांना सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींसोबत शिवाजी पार्कवरील सभेला उपस्थित राहणार आहेत.(Pm modi rally at shivaji park) तर काँग्रेसमधील गांधी घराण्यातील कोणताही सदस्य बीकेसी येथील सभेला उपस्थित असणार नाही.(Mahavikas aghadi rally at bkc) मात्र, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.(Kejriwal in mumbai rally)

बीकेसी मैदानावर होणाऱ्या इंडिया आघाडीच्या सभेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण पाठवले होते. मात्र, आपापल्या निवडणूक प्रचारात व्यस्त असल्यानं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत. प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधी परिवारातील एकही सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत.(Rahul Gandhi will absent in mumbai rally) महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांचे लक्ष मुंबईतील 6 जागांवर आहे.

महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह- शिवाजी पार्कवर होणाऱ्या महायुतीच्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह अन्य पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. (raj thackeray,pm modi mumbai news) ही सभा यशस्वी करण्यासाठी भाजपासह मनसेच्या नेत्यांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे. बुधवारी मुंबईत झालेल्या पंतप्रधान मोदींच्या रोड शोमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यात आता मोदींच्या सभेमुळे आणखी भर पडणार आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. (On 20 may voting of fifth phase) हे मतदान धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघासाठी होणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. अशा परिस्थितीत मुंबईतील सहा मतदारसंघावर विजय मिळविण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

Latest Posts

Don't Miss