Theonlinereporter.com – May 14, 2024
Chhagan bhujbal Latest News : घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपाच्या बाजूला लावण्यात आलेले होर्डिंग कोसळले. (Ghatkopar Hoarding Accident) त्यात १४ जणांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी हाहा:कार उडत आहे. भाजपने या प्रकरणात उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरले आहे. होर्डिंग असलेला कंपनीचा मालक भावेश भिडे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो आमदार राम कदम यांनी शेअर केले आहे. आता या प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्या मदतीसाठी विरोधी पक्षातील नेता धावून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे. सरकार आमचं आहे, महानगरपालिका सुद्धा सध्या आमचीच आहे. उद्धव ठाकरेंचा काय संबंध? असा सवाल भुजबळ यांनी केला आहे. (Chhagan Bhujbal on Uddhav thackeray)
राज्यात सरकार आमचं आहे. मुंबई महानगरपालिका सुद्धा सध्या आमचीच आहे. मग त्या होर्डिंग प्रकरणाचा उद्धव ठाकरे यांच्याशी काय संबंध आहे. (What is the connection of hoarding case with Uddhav Thackeray) राजकीय नेत्यांना अनेक लोक भेटण्यास येतात. व्यापारी सगळ्यांकडे येतात. मिठाई घेऊन येतात आणि फोटो काढतात. यामुळे यामध्ये उद्धव ठाकरे यांचा संबंध नाही.(Uddhav Thackeray has not any relation with hoarding case) या प्रकरणात राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये, असे भुजबळ यांनी म्हटले.
मुंबईत एअर पोर्टकडे जाताना असे अनेक हॉर्डिंग दिसतात. ते होर्डिंग समांतर हवे होते पण ते रस्त्यावर आहेत. त्यांचे वजन सुद्धा भरपूर आहे. हे सगळे अनधिकृत आहेत. त्या सर्व होर्डिंगची चौकशी झाली पाहिजे.(Enquiry must done of all hording) हे बेकायदेशीर होर्डिंग काढण्यासाठी वेळ कशाला काढता? आता सर्व प्रशासकीय संस्थांनी धडक कारवाई करण्याची गरज आहे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.