Sanjay Raut Big Statement On Nashik Scam : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. नाशिक महानगरपालिकेत ८०० कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता राज्यात एकच खळबळ उडाली आहे. (Nashik Municipal Corporation 800 cr scam) या घोटाळ्याचे लाभार्थी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. (Sanjay Raut Allegations Against CM Shinde) नाशिकमधील बिल्डर ठक्कर, ननवाणी आणि शाह यांच्यासह इतरांनी हा भूसंपादन घोटाळा केला आहे.
संजय राऊत म्हणालेत मुख्यमंत्र्यांसोबत दोन दिवसांपूर्वी हे बिल्डर नाशिकमध्ये मांडीला मांडी लावून बसले होते. (Sanjay Raut on cm Shinde) यामधील ठक्कर बिल्डर यांनी दोन कोटींची जमीन घेऊन नाशिक महानगरपालिकेला ५० कोटी रुपयांना विकल्याचा आरोप राऊत यांनी केला. मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी नाशिक मनपातील घोटाळ्यासंदर्भात गंभीर आरोप केले. नाशिक शहर देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले होते. या शहरातच ८०० कोटींची भूसंपादन घोटाळा बिल्डर लॉबीकडून झाला आहे. त्यात नाशिक मनपाची फसवणूक झाली आहे.(Nashik 800 cr Land acquisition scam) या बिल्डर लॉबीने शेतकरी नसताना शेत जमीन घेतली आहे. सरकारची स्टॅप ड्यूटी डुबवली आहे. या बिल्डर लॉबीत ठक्कर बिल्डर हे सर्वात मोठे लाभार्थी आहेत. त्यांना ३५३ कोटींचा लाभ झाला आहे. ननवाणी आणि शाह यांनाही कोट्यवधींचा लाभ झाला आहे.
ठक्कर यांनी २ कोटींची जमीन विकत घेतली आणि मनपाला ५० कोटीला विकली. त्यांच्या प्रत्येक व्यवहाराचा पुरावा आपल्याकडे आहे. (Sanjay Raut on proff of 800 cr scam) ठक्कर, ननवाणी आणि शाह यांना कोट्यवधींचा लाभ झाला आहे. तसेच यामध्ये इतर बिल्डर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणात लाभार्थी आहेत. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नाशिकला आले असताना मुख्यमंत्र्यांच्या शेजारी हे बिल्डर बसले होते. आता या प्रकरणाची तक्रार ईडी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे. (Sanjay Raut to complaint ed on Nashik scam)
शेतकरी असल्याचे दाखवून या बिल्डरांनी फसवणूक केली आहे. या प्रकरणात एसआयटी स्थापन करावी, (Sanjay Raut demand sit on 800 cr nashik scam) गुन्हे दाखल करावे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आता हे गुन्हे दाखल झाले नाही तर आमचे सरकार आल्यावर ८०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपींना मनी लॉन्ड्रींगच्या गुन्ह्याखाली तुरुंगात जाणार आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.