Sunday, November 17, 2024

Latest Posts

होर्डिंग दुर्घटनास्थळी सत्ताधारी विरोधकांत शाब्दीक बाचाबाची

Theonlinereporter.com – May 14, 2024 

Mumbai Hoarding Collapse Case : घाटकोपरच्या परिसरात एका पेट्रोल पंपाच्या छतावर भलंमोठं होर्डिंग कोसळलं. (Mumbai Hoarding news) लोखंडी आणि स्टीलचे रॉड असलेल्या या होर्डिंगखाली अख्खा पेट्रोल पंप दबला गेला. (Hoarding collapse on petrol pump) पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी आलेल्या वाहनांसह जवळपास 100 लोक या पेट्रोल पंपाखाली दबले गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. (14 People died in hoarding collapse) मात्र आता यात सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले असून यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

घाटकोपर येथे दुर्घटनास्थळी फायर ब्रिगेड आणि NDRF चे जवान अजूनही बचाव कार्यात गुंतले आहेत. (NDRF at hoarding collapse incident) प्रशासन आपल्यापरीने जीव वाचण्याचे सर्व प्रयत्न करतय. त्याचवेळी होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा आणि महाविकास आघाडीचे नेते आपसात भांडत असल्याच चित्र दिसलं. (Mahavikas aghadi and bjp leaders at hoarding collapse) भाजपा नेते किरीट सोम्मय्या, मिहिर कोटेचा आणि पराग शहा घटनास्थळी होते. त्याचवेळी महाविकास आघाडीचे संजय दीना पाटील सुद्धा तिथे होते. (Sanjay dina patil vs kirit somaiya) त्यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. संजय दीना पाटील आणि मिहिर कोटेचा उत्तर-पूर्व लोकसभा म्हणजे ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवत आहेत.

मविआ नेते संजय दीना पाटील यांनी किरीट सोमय्यांवर आक्षेप घेतला. किरीट सोमय्या घटनास्थळी आत गेल्याने संजय दीना पाटील भडकले. “भाजपा नेते बचाव कार्यात अडथळे आणत आहेत. सोमय्यांमुळे बचाव कार्य काही काळ थांबवून ठेवलं होतं” असा आरोप संजय दीना पाटील यांनी केला. “खोट बोलतायत, ते उल्लू बनवत आहेत. खोटं बोलण यांचं काम आहे. ते का आत गेले? प्रशासनाच्या कामात अडथळे आणतात” असा आरोप संजय दीना पाटील यांनी केला.(Sanjay dina patil Accusation on kirit somaiya) ‘कॅमेरा घेऊन किरीट सोमय्या आतमध्ये शायनिंग मारण्यासाठी गेले होते का?’ असा सवाल संजय दीना पाटील यांनी विचारला.

Latest Posts

Don't Miss