| TOR News Network | Ravindra Waikar Latest News : उद्धव ठाकरे यांच्यासोबत असताना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आमदार रवींद्र वायकर यांच्यावर कारवाई केली होती. (Earlier Ed Action on ravindra waiker) जोगेश्वरीतील बीएमसीच्या जमिनीवर एका आलिशान हॉटेलच्या कथित बांधकामाप्रकरणी ईडीने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर वायकर यांना आता थेट लोकसभेची लॉटरी लागली आहे.(Ravindra waikar from shinde sena for Lok sabha)
शिंदे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना अखेर उत्तर पश्चिम मुंबईमधून शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली आहे. (Waikar to contest lok sabha from shinde sena) शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहण्याची पसंत केले होते.मात्र त्यानंतर जोगेश्वरीतील बीएमसीच्या जमिनीवर एका आलिशान हॉटेलच्या कथित बांधकामाप्रकरणी ईडीने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.(Ed register case on waikar) अशात त्यांनी ठाकरे यांना राम राम ठोकत व शिंदे गटात प्रवेश केला. आता त्यांना उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. (Ravindra waikar from north west mumbai constituency) तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेकडून अमोल किर्तीकर एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. (Ravindra waikar vs amol kirtikar)
जुलै 2022 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जवळपास 40 आमदार उद्धव ठाकरेंना सोडून गेले होते. मात्र, ठाकरेंसोबत राहिलेल्यांमध्ये रविंद्र वायकरांचा समावेश होता.जानेवारी-जुलै 2021 मध्ये बीएमसीची दिशाभूल करून हॉटेल बांधण्यासाठी बेकायदेशीरपणे मंजुरी घेतल्याचा आरोप आमदार वायकर आणि इतरांवर असल्याची माहिती आहे. (Illegal approval for construction of hotel) जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर असलेली ही जमीन क्रीडा आणि मनोरंजनासाठी राखीव होती, ती वायकर आणि इतरांना सार्वजनिक वापरासाठी देण्यात आली होती. मात्र, या सर्वांनी या जमिनीचा व्यावसायिक कारणासाठी वापर केला, असा आरोप आहे.