Sunday, November 17, 2024

Latest Posts

जर विरोधातील खासदार असेल तर निधी मिळत नाही

| TOR News Network | Baramati News : जर विरोधातील खासदार असेल तर निधी मिळत नाही, अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, ही वस्तुस्थिती आहे.(Trouble comes to get fund for opposition MP) सरकार पडल्यानंतर काम ठप्प झाली याचे बारामतीकर साक्षीदार आहेत, सत्ता नसेल तर विकास होत नाही, (If now power no developmet) हे मतदारांनी विचारात घ्यायला हवे असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.ते कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. (Ajit pawar to baramatikar)

अजित पवार म्हणाले, ही निवडणूक भावनिक बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे, (They are making the election emotional) ज्येष्ठ नेते शरद पवार यांना बारामती व माढा दोन्ही कडे लोकांनी निवडून दिले, नंतर त्यांनी राज्यसभेवर जायचा निर्णय घेतला, त्या नंतर पक्ष तुम्ही चालवा असे त्यांनी सांगितले, आम्ही त्यालाही मान्यता दिली.

नंतर काही घटना घडल्या, कुणी काय निर्णय घ्यावा हा ज्यांचा त्यांचा अधिकार आहे, शेवटपर्यंत मला जे काही सांगितल गेल, तेच मी ऐकल, कुठही कमी पडलो नाही, साहेब फॉर्म भरुन जायचे, शेवटच्या सभेला यायचे आणि आपण सगळे काम करायचो.

आज परिस्थिती बदलली आहे, केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. जर तुमच्याकडे फक्त राज्याचाच निधी येणार असेल केंद्राचा निधी येणारच नसेल तर विकास कसा होणार. (No development without fund) पाण्याचा सर्वात महत्वाचा प्रश्न सोडविताना आपल्याला राज्यासोबतच केंद्राचाही निधी लागणार आहे, ही बाब सर्वांनी लक्षात घ्यायला हवी.

अनेक मोठ्या प्रकल्पांना मार्गी लावताना केंद्राची मदत घ्यावीच लागते, (Central govt help is must for development) त्या साठी महायुतीच्या विचाराचा खासदार व्हायला हवा. सरकारच्या बाहेर राहीलो असतो तर आंदोलन, उपोषण, मोर्चा इतकच करायला लागले असते. मागे शिवसेनेसोबत जायला सांगितले आपण गेलो, भाजपला बाहेरुन पाठिंबा दिला, त्यांच्या कारकिर्दीत ते जे म्हणतील ते केल.

मुख्यमंत्रीपदही आपण त्या काळात कॉंग्रेसला दिले. जे जे सांगितल ते ते ऐकल, आता भावनिक व्हायच नाही, वडीलधारी मंडळींच अंतःकरण जड होतय पण माझी त्यांना विनंती आहे की तुमच्या काळात पाणी आणता आल नाही आम्ही तो प्रयत्न करतोय. मी विकासासाठी मत मागतोय,(I ask vote on development) सत्तेसाठी मत मागत नाही, बारामतीकरांनी मला भरभरुन दिलय, मी समाधानी आहे. जिरायत भागाचा कायापालट करायचा आहे म्हणून मत मागतोय.

Latest Posts

Don't Miss