Monday, November 18, 2024

Latest Posts

आपला पराभव होतोय हे आता त्यांच्या लक्षात येतंय

| TOR News Network | Sharad Pawar On Bjp : देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर नुकतीच टीका केली.(Devendra Fadnavis On Sharad Pawar) पवार साहेबांनी किती कोलांट्या उड्या मारल्या याचे व्हिडीओ दाखवले, तर अवघड होईल, असं फडणवीस म्हणालेत. त्याला आता शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Sharad Pawar Answer to fadnavis) फडणवीस काय म्हणतात त्याला अर्थ नाही. आपला पराभव होतोय हे आता त्यांच्या ( भाजपच्या) लक्षात येतंय. (Bjp Comes to know about defeat) मोदींचं भाषण बघा, अमित शाहांचं भाषण ऐका, सगळ्यात माझ्यावर टीका असते. भाजपला त्यांचा पराभव आता स्पष्टपणे दिसतोय, अशा शब्दात पवार यांनी फडणवीसांवर पलटवार केला.(BJP can clearly see their defeat now)

सोलापूरच्या माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सभेदरम्यान शरद पवार यांनी मोदींचा एक जुना व्हिडीओ दाखवत त्यांच्यावर टीका केली होती.(Sharad pawar plays old video) त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. मात्र पवार यांनी फडणवीसांना चोख प्रत्युत्तर दिलं.(But Pawar gave a befitting reply to Fadnavis)

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय नेत्यांच्या प्रचारसभा, बैठकांना वेग आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आणि प्रचारगीत आज प्रकाशित करण्यात येणार आहे.(Sharad Pawar manifesto realesed) त्यापूर्वी धाराशिवमध्ये ते पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी भाजप, मोदी आणि फडणवीसांवर कडाडून टीका केली. (Sharad pawar slams modi and fadnavis)आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा गेल्या १० वर्षांत तुम्ही काय केलं हे लोकांना सांगण्याची जबाबदारी तुमची आहे, माझ्याकडे जबाबदारी होती तेव्हा मी काय काम केलं हे लोांना माहीत आहे, असं ते म्हणाले.

त्यांच्याकडे मांडायला काही नाही

मोदी असोत किंवा अमित शाह अथवा इतर कोणी, त्यांच्या भाषणात सतत फक्त माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर टीका असते. गेल्या १० वर्षांपासून तुम्ही सत्तेवर आहात. त्या काळात तुम्ही काय केलंत? त्याचा लेखाजोगा आधी लोकांसमोर मांडा, उगीच मागच्या गोष्टी काढू नका, असं पवारांनी सुनावलं. त्यांच्याकडे मांडायला काही नाहीच, लोकांना सांगायला काही नाही म्हणून ते असे आरोप करत आहेत, (त्यांच्याकडे) दुसरे काही उद्योग नाहीत अशी टीकाही शरद पवार यांनी केली.

लोकांची फसवणूक सुरू

सोलापूरच्या माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची सभा झाली. (Sharad Pawar Meeting at Solapur madha lok sabha) यावेळी शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांचा एक जुना व्हीडिओ दाखवला. शरद पवारांनी नरेंद्र मोदींचं जुनं भाषण ऐकवलं.(Sharad Pawar Played old video of modi) गेले दहा वर्षे देशात भाजपकडं सत्ता आहे. मोदींच्या हातात देशाचा कारभार आहे. अनेक आश्वासनं दिली कि मी महागाई कमी करणार. 50 दिवसाच्या आत पेट्रोलची किंमत 5 रुपयाच्या खाली आणणार 2014 आधी पेट्रोलची किंमत 72 रुपये होती. पण आज 106 रुपये किंमत आहे. निवडणुकीआधी दिलेली आश्वासनं पाळली गेली नाहीत. लोकांची फसवणूक सुरु आहे, असं शरद पवार म्हणाले.(The promises made before the elections were not kept)

Latest Posts

Don't Miss