Sunday, January 12, 2025

Latest Posts

वापरा आणि फेकून द्या अशी भाजपची गॅरंटी

| TOR News Network | Uddhav Thackeray Latest News : २०१२ मध्ये नरेंद्र मोदी आमच्या घरी आले होते. २०१४ मध्ये ते पंतप्रधान झाले. आम्हाला स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं. पण, पुढे त्यांनी आपलं वर्तन बदललं. माझ्या वडिलांच्या निधनानंतर अमित शहांना वाटलं की ते आता शिवसेनेवर घाव घालू शकतात. वापरा आणि फेकून द्या अशी भाजपची गॅरंटी आहे. २०१९ मध्ये त्यांनी माझ्यासोबत तेच केलं असं ठाकरे म्हणाले.(Use and throw is bjp’s policy)

उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदासाठी मार्गदर्शन करुन मी दिल्लीच्या राजकारणात जातो असं म्हटलं होतं, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.एका वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (Devendra Fadnavis said he prepared Aditya Thackeray for CM)

मी माझ्या वडिलांना वचन दिलं होतं की शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन. अमित शहा यांच्यासोबत ठरलं होतं की भाजप आणि शिवसेनेमध्ये अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्री असेल. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ते माझ्या मुलाला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतील. तसेच मी दिल्लीच्या राजकारणात जाणार आहे असंही ते म्हणाले होते.त्यांनी माझ्या लोकांसमोर मला खोटं ठरवलं, असं ठाकरे म्हणाले आहेत. (Uddhav Thackeray on devendra fadnavis)

भाजपसोबत असलेला एकही घटकपक्ष खूश नाही. सगळे तुटके-फुटके लोक भाजपसोबत आहेत. आपल्या नेत्यासोबत देखील ते असंच करतात. भाजप हा व्यॅक्युम क्लिनर आहे. (BJP is a vacuum cleaner) त्यांच्याकडे गेल्यास भ्रष्टाचाराचा आरोप असलेले लोक स्वच्छ होतात. प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण, अजित पवार यांना भाजपकडून क्लिनचिट मिळाली आहे, असं म्हणत ठाकरेंनी टीका केली.

आमचं हिंदूत्व त्यांच्या हिंदूत्वापेक्षा पूर्ण वेगळं आहे. आमचं हिंदूत्व ‘घर का चुल्हा जलाने वाला है’, पण त्याचं हिंदूत्व लोकांचं घरे जाळणारं आहे.(His Hinduism is burning people’s houses) आम्ही मुस्लिमांविरोधात नाही, आम्ही फक्त देशद्रोह्यांविरोधात आहोत. आम्ही आमची भूमिका बदलेली नाही, असं ठाकरेंनी स्पष्ट केलं. भाजपने अनेकदा आम्हाला फसवलं आहे. त्यामुळे परत त्यांच्याकडे जाण्याचा प्रश्नच नाही, असंही ते म्हणाले. (We will never go to bjp)

Latest Posts

Don't Miss