| TOR News Network | Vidarbha Lok Sabha News : पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघात रामटेक वगळता काँग्रेसची अन्य चार ठिकाणी भाजपसोबत तर रामटेकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या उमदेवारासोबत लढत होत आहे. भाजप आणि काँग्रेस या पक्षातच खरी लढत होणार असली तरी बसपा आणि वंचितच्या एंट्रीमुळे येथील लढती रंजक झाल्या आहेत. (Tough Fight in Vidharbha Lok Sabha)
नितीन गडकरी हॅट्ट्रिक साधणार का?
भाजपचे केंद्रीय मंत्री असणारे नितीन गडकरी हे यावेळी नागपुर मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवीत आहेत. (Nagpur Lok Sabha Latest News) नागपूर हा मतदारसंघ पूर्वीं कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. सतत सात निवडणुका येथून काँग्रेसचे विलास मुत्तेमवार हे निवडून येत होते. मात्र, 2014 च्या निवडणुकीत गडकरी यांनी विलास मुत्तेमवार यांचा सुमारे 3 लाख मतांच्या फरकाने पराभव केला. 2019 मध्ये येथूनच काँग्रेसचे नाना पटोले यांचा गडकरी यांनी पराभव केला. मात्र, यावेळी गडकरी यांचा सामना काँग्रेसचे नागपूर पश्चिमचे आमदार विकास ठाकरे यांच्याशी होत आहे.(Nitin gadkari vs Vikas thackeray)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालयही नागपूर येथेच आहे. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मूळ गाव. गडकरी यांनी विद्यार्थीदशेपासून नागपूरमधूनच राजकारण सुरु केले. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे नाना पटोले यांचा गडकरी यांनी दोन लाख मतांनी पराभव केला होता. विशेष म्हणजे नाना पटोले हे बाहेरचे उमदेवार असतानाही त्यांनी चार लाख मते घेतली होती. पण, आता विकास ठकारे हे नागपूरचेच आमदार आहेत. ही ठाकरे यांची पहिलीच लोकसभा निवडणूक आहे.मात्र यंदा काँग्रेसने स्थानिक उमेदवार दिल्याने काँग्रेस एकदिलाने प्रचारात उतरली आहे. वंचित आघाडीने येथे काँग्रेसला पाठींबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसची बाजू भक्कम झाली असे दिसत असले तरी गडकरी यांचा जनसंपर्क, त्यांनी केलेली विकासकामे ही त्यांच्या जमेची बाजू आहेत. 2024 च्या निवडणुकीत नागपूर मतदारसंघातून एकूण 26 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. नागपूरमध्ये दलित मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. वंचितने काँग्रेसला पाठींबा दिला असला तरी बहुजन समाज पार्टीचे योगश लांजेवार हे रिंगणात असल्याने ही दलित मते कुणाच्या बाजूने झुकणार हा प्रश्न आहे.
मुनगंटीवार कॉंग्रेसचा विजय रोखणार ?
भाजपने चंद्रपूरमधून राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. (Chandrapur lok sabha latest News) सुरवातीला लोकसभा लढविण्यासाठी सुधीर मुनगंटीवार उत्सुक नव्हते. पण पक्ष आदेश पालन करत त्यांनी प्रचारात स्वतःला झोकून घेतले आहे. 1995 पासून सुधीर मुनगंटीवार विधानसभा निवडणूक लढवून सातत्याने जिंकत आले आहेत. शिवसेना – भाजप युतीचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ते मंत्री होते आणि आता शिंदे सरकारमध्येही मंत्री आहेत.
2019 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील केवळ चंद्रपूर या एकाच मतदार संघातून कॉंग्रेसला विजय मिळाला होता. कॉंग्रेसचे सुरेश धानोरकर यांनी या निवडणुकीत विजयी झाले होते. मात्र, गेल्यावर्षी त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे ही जागा रिक्त होती. ही जागा लढविण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी काँग्रेसच्यावतीने दावा सांगितला होता. परंतु, कॉंग्रसने दिवंगत खासदार सुरेश धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली. (Sudhir Mungantiwar vs Pratibha Dhanorkar) त्यामुळे चंदपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध कॉंग्रेसच्या प्रतिभा धानोरकर अशी प्रमुख लढत होताना दिसेल.
2024 च्या निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून 15 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यात बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र रामटेके आणि वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले याचा समावेश आहे. गेल्यावेळी वंचितने लाखांहून अधिक मते घेतली होती. तरीही कॉंग्रेसचे दिवंगत खासदार धानोरकर यांनी प्रतीस्पर्धी उमेदवाराचा 44 हजार मतांनी पराभव केला होता.
काँग्रेसच्या आमदारामुळे रामटेकमध्ये रोमांचक लढत
पाच जागांसाठी विदर्भात मतदानाचा पहिला टप्प्या 19 एप्रिलला पार पडणार आहे. या पाचपैकी केवळ रामटेक लोकसभा मतदारसंघ वैशिठ्यपूर्ण ठरणार आहे. (Ramtek Lok sabha Latest News) याची दोन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा सामना काँग्रेससोबत होणार आहे. कॉंग्रेसचे विद्यमान आमदार राजू पारवे यांना शिवसेना पक्षात आणून एकनाथ शिंदे यांनी त्यांना निवडणुकीत उतरविले आहे. राजू पारवे यांच्याविरोधात कॉंग्रेसने श्यामराव बर्वे हे रिंगणात उतरले आहेत.(raju parve vs shyam barve)
मुळात कॉंग्रेसने येथून रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती. पण, त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला तर त्यांचे पती श्यामराव बर्वे यांचा अर्ज वैध ठरला. त्यामुळे आता श्यामराव बर्वे हे येथून कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत.या निवडणुकीत रामटेकमधून एकूण 16 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. बसपाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, वंचित बहुजन आघाडीचे शंकर चहांदे यांच्यासोबत काँग्रेसचे किशोर गजभिये यांनी बंडखोरी करून अर्ज कायम ठेवला आहे. यामुळे कॉंग्रेस उमेदवार श्यामराव बर्वे यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
रामदास तडस की अमर काळे
वर्धा लोकसभेची निवडणूक यंदा चांगलीच रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे. (Wardha lok sabha latest news) यंदा महायुतीकडून भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे उमेदवार अमर काळे समोरासमोर आहेत. (Ramdas Tadas vs Amar Kale)अमर काळे हे आर्वी विधान सभा क्षेत्राचे माजी आमदार आहेत. ते पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. महायुतीचे घटक पक्ष शिंदे शिवसेना वर्ध्यात कमजोर आहे.तर अजित पवारांनी राष्ट्रवादी सोडल्यामुळे येथे त्यांचा प्रभाव कमी आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीसाठी येथे पोषक वातावरण आहे.जरी अमर काळे हे काँग्रेसला सोडून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असला तरी काळ यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम पणे उभी असल्याचे चित्र आहे.तर उध्दव ठाकरे गट देखील पूर्ण ताकदीने मैदानात आहे. नुकतेच रामदास तडस यांच्या सुनेने सासरे छळ करत असल्याचा अरोप केला होता.त्यामुळे त्यावर तडस यांना खुलासा करावा लागला.ऐन निवडणूकीच्या तोंडावर हा मुद्दा आल्याने तडस यांना याचा फटका बसू शकतो असे बोलल्या जात आहे.