| TOR News Network | Jalna Loksabha News 2024 : यंदा जालना लोकसभेच्या निवडणूकीत मोठी टक्कर पहाला मिळणार आहे. विद्यमान खासदार रावसाहेब दानवे याच्या विरोधात काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे असणार आहेत. (Raosaheb danve vs kalyan kale) 2009 च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. कल्याण काळे यांनी भाजपचे रावसाहेब दानवे यांच्यात पहिल्यांदाच लढत झाली. तेव्हा कल्याण काळे यांचा आठ हजार मतांनी पराभव झाला होता. (Kalyan Kale was defeated by eight thousand votes) त्यानंतर आता पुन्हा काँग्रेसकडून कल्याण काळे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. पण आता परिस्थिती बदलली असल्याने दानवेंचे टेंशन वाढले आहे.(Kalyan Kale from congress)
जालन्यात पुन्हा 2009 प्रमाणेच रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) विरुद्ध कल्याण काळे यांच्यात सामना रंगणार आहे. (Raosaheb danve vs kalyan kale)काँग्रेसकडून या मतदारसंघात पुन्हा काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे (Kalyan Kale from congress) निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने पक्षाकडून त्यांची उमेदवारी निश्चित केली आहे.
विकासाच्या मुद्द्यांवर दानवे ही लोकसभा लढणार असल्याचे उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांनी सांगितले आहे, तर काळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक लढणार याकडे लक्ष लागले आहे. या पूर्वी कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरोधात दोनदा निवडणूक लढविली होती. मात्र, ते पराभूत झाले होते. (danve defeated kale 2 times)
रावसाहेब दानवे यांनी १९९९ पासून जालना लोकसभा मतदारसंघाचा ताबा घेतला आहे. पहिल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे ज्ञानदेव बांगर यांना पराभूत केले होते. त्यानंतर उत्तमसिंग पवार, कल्याण काळे, विलास औताडे यांनाही त्यांनी प्रत्येकी दोनदा पराभूत केले. जालना जिल्ह्यात १९९९ मध्ये सर्वाधिक ७२.४८ टक्के मतदान झाले होते. गेल्या निवडणुकीत म्हणजे २०१९ मध्ये रावसाहेब दानवे ५७.७३ टक्के मतदान घेऊन निवडून आले होते.