Monday, November 18, 2024

Latest Posts

अखेर संजय निरुपम यांचा काँग्रेसला राम राम

| TOR News Network | Sanjay Nirupam Resign From Congress: यंदाच्या निवडणूकीत काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. काल काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर आज  त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.(Nirupam left congress) त्यांनी यासंबधीची पोस्ट सोशल मिडीयीवर शेअर केली आहे. त्यामुळे आता पुढे संजय निरुपम काय भूमिका घेणार? हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.(Attention towards Sanjay nirupam next step)

संजय निरुपम यांची काल काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. 6 वर्षांसाठी हकालपट्टी होत असल्याचं के सी वेणुगोपाल यांनी जाहीर केलं. महाराष्ट्र काँग्रेसने त्यांच्या हकालपट्टीची शिफारस केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

उत्तर पश्चिम मुंबईतून तिकीट न मिळाल्याने संतापलेल्या निरुपम यांनी एकीकडे काँग्रेसला अल्टिमेटम दिला होता, तर दुसरीकडे काँग्रेस पक्षानेही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. काँग्रेसनेही त्यांच्या स्टारच्या यादीतून त्यांचे नाव देखील काढून टाकले आहे.

त्यामुळे झाली कारवाई

शिवसेनेसोबत (UBT) जागावाटपाच्या मुद्द्यावर त्यांनी केलेल्या टिप्पणीवरून काँग्रेसने ही कारवाई केली होती. दरम्यान स्टार प्रचारकाच्या यादीतून काढल्यावर त्यांनी थेट काँग्रेसवर टीका केली होती. (Nirupam Criticized Congress) त्यामुळे त्यांची 6 वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. (Expulsion from the party for 6 years) गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात संजय निरुपम भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरु होती. अशातच आता लवकरच ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करु शकतात, अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत.(Nirupam can join shivsena) त्यामुळे त्यांच्या नव्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आज त्यांनी त्यांचा राजीनामा सादर केला आहे.(Nirupam submitted his resignation)

Latest Posts

Don't Miss