Monday, November 18, 2024

Latest Posts

 शरद पवार हे नाव सोडून कोल्हेंकडे दुसरं भांडवलच नाही

| TOR News Network | Adhalarao Patil Latest News : आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांना आम्ही विसरु शकत नाही. वळसे पाटलांसह मला आजही शरद पवारांबद्दल आदर असल्याची भावना आढळराव पाटीलांनी व्यक्त केली. मात्र अमोल कोल्हे शरद पवारांचे नाव घेऊनच प्रचार करत असून शरद पवार हे नाव सोडून कोल्हेंकडे दुसरं भांडवलच नाही. (Amol kolhe Vs Adhalarao Patil) शरद पवारांसोबत निष्ठा ठेवून उभा आहे, असे सांगुन मत मागणार असाल पण शरद पवारांची गोष्ट वेगळी आहे. आता त्यांच्या नावाने मत मागण्याचे तुमचे दिवस गेलेत अशा आढळराव पाटीलांनी कोल्हे यांना खडेबोल सुनावलेत. (Shivajirao Adhalarao Patil On Amol Kolhe)

शिरुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोल्हे विरोधात अजित पवार गटाचे शिवाजी आढळराव पाटील उमेदवार आहेत. (Shirur Lok sabha ) दोन्ही नेत्यांनी प्रचार सुरु केला आहे. अमोल कोल्हे यांच्या विरोधात त्यांच्या मतदार संघात बॅनर झळकले आहेत. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात बॅनरच्या माध्यमातून अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आले आहे.

पाच वर्षात कोल्हे मतदारसंघात फिरकले नाहीत

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली शिरूर लोकसभा मतदारसंघात आता राजकीय घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील तर महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे निवडणुकीत पुन्हा आमनेसामने आले आहेत. दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचाराची सुरूवात करून दिली आहे. (Election campaign in shirur) मात्र गेल्या पाच वर्षात अमोल कोल्हे मतदारसंघात फिरकले नाहीत, अन् आता प्रचारासाठी मतदारसंघात येत आहेत, अशी नाराजी आता लोकसभा मतदारसंघात नागरिकांकडून दिसू लागली आहे.

खासदार साहेब पाच वर्ष तुम्ही कुठे होता

खासदार झाल्यानंतर अमोल कोल्हे यांचा जनतेशी पाहिजे तसा जनसंपर्क राहिलेला नाही. आता अमोल कोल्हे यांनी आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात प्रचार दौरा केला. या वेळी परिसरात अमोल कोल्हे यांच्या विरोधात बोलके पोस्टर लागलेले पाहावयास मिळाले. त्यात विद्यमान खासदार साहेब पाच वर्ष तुम्ही कुठे होता ? (Mr. MP, where were you for five years?)कोरोना सारख्या भयंकर परिस्थितीमध्ये तुम्ही मतदारसंघांमध्ये का नव्हता? पाच वर्ष मतदारसंघात नाही पण प्रचारासाठी तुम्हाला वेळ कसा भेटला ? असे तीन मोजके पण मार्मिक प्रश्न विचारण्यात आले आहे. खासदार साहेब उत्तर द्या, एक सुज्ञ नागरिक असे त्या बॅनरवर म्हटले आहे.शिरुर मतदार संघात आंबेगावमध्ये लागलेल्या या बॅनरची चर्चा पाहावयास मिळत आहे. (Banner against Mp kolhe)

Latest Posts

Don't Miss