| TOR News Network | Navneet Rana Latest News : महायुतीकडून अमरावती लोकसभेची उमेदवारी खासदार नवनित राणा यांना मिळाली आहे. (Amravati Politics Rana News) त्यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपाच्या गटात नाराजी पसरली आहे.तसेच महायुतीतील शिवसेनाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी तर आम्ही राणांचा प्रचार करणार नाही असे उघड वक्तव्य केले आहे. आपल्याला पक्षातून विरोध होत असल्याची जाणीव होताच राणांनी आता भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भावनिक होत संवाद साधणे सुरु केला आहे. (Navneet rana emotional propaganda)
मी सगळ्यांना विनंती करते, मला लहान म्हणून सांभाळून घ्या. सगळ्यांनी एकत्र या कुठे चूक झाली तर तुम्ही पुढे राहा, मी मागे राहीन, असं भावनिक आवाहन नवनीत राणा यांनी केले. भाजपाच्या कार्यक्रमात नवनीत राणा बोलत होत्या. (Navneet Rana’s emotional appeal)
महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक लोकांनी साथ सोडली. पण आम्ही महायुती सोबत कायम होतो.(We Still with mahayuti) सत्ता नसतानाही कायम होतो आणि सत्ता असतानाही कायम आहे आणि पुढे कायम राहील, असा टोलाही नवनीत राणा यांनी लगावला.
अपक्ष असताना मी मोठ्या प्रमाणावर अमरावतीमध्येसाठी निधी आणला.(Brought Big funds for Amravati) जर कमळाच्या चिन्हावर निवडून गेले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या प्रमाणावर अमरावतीच्या विकासासाठी निधी देतील, असं आश्वासन देखील नवनीत राणा यांनी अमरावतीकरांना दिलं.(Pm Modi Will Give More Funds)
ऱाणांच्या प्रचाराला अमित शहा अमरावतीत येणार
नवनीत राणा 4 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील त्यावेळी उपस्थित राहणार आहेत.नामांकन रॅलीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या बुथप्रमुखांची महत्त्वाची बैठक पार पडेल. नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी 7 किंवा 8 तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची अमरावतीत प्रचार सभा होण्याची शक्यता आहे.(Amit Shah To grace rally in amravati)