Monday, November 18, 2024

Latest Posts

तुला माझ्या मतदारसंघातून एक लाखाच्यावर लीड मिळवून देईन

| TOR News Network | Girish Mahajan Latest Statement : रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने अद्याप उमेदवार दिलेला नाही. पण, रक्षा खडसे यांनी प्रचाराचं रान उठवून दिलं आहे. त्यांनी गावागावात जाऊन सभा घेण्यास सुरुवात केली आहे. लोकांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. भर उन्हात त्यांचा प्रचार सुरू आहे. त्यांच्या प्रचाराचा धडाका सुरू असतानाच भाजपचे संकटमोचक गिरीश महाजनही त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. तू चिंता करू नकोस. तुला माझ्या मतदारसंघातून मोठं लीड मिळवून देईन, असा विश्वास गिरीश महाजन यांनी रक्षा खडसे यांना दिला आहे. (Girish mahajan on raksha khadse)

आजारपणामुळे खडसेंचा लढण्यास नकार

रक्षा खडसे या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. एकनाथ खडसे यांनी रावेरमधून सुनेविरोधात लढण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, रक्षा खडसे यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी रावेरमधून लढण्यास नकार दिला. खडसे यांनी आजारपणाचं कारण देऊन लढण्यास नकार दिला. त्यामुळे राष्ट्रवादीकडून या मतदारसंघात कुणाला उमेदवारी दिली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जामनेरमध्ये भाजपचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला रक्षा खडसे, गिरीश महाजन आणि महाजन यांच्या पत्नी साधना महाजनही आल्या होत्या. याप्रसंगी भाजपचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी त्यांना हा दिलासा दिला.(Girish mahajan to raksha khadse) तू चिंता करू नकोस. जामनेर मतदारसंघातून एक लाखाच्यावर तुला लीड राहील, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी रक्षा खडसेंना दिला. (One lakh lead from jamner constituency)

भाजप शिस्तबद्ध पद्धतीने काम करणारी पार्टी

दरम्यान, भाजपच्या एका बैठकीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओतून रक्षा खडसे या गिरीश महाजन यांच्यासमोरच पदाधिकाऱ्यांवर नाराज झालेल्या दिसत आहेत. या व्हायरल व्हिडीओवर रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Mahajan on viral video) गिरीश महाजन, स्मिता वाघ, मंगेश चव्हाण यांच्यासोबत झालेल्या भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा म्हणजे कोअर कमिटीचा व्हिडिओ अशाप्रकारे वायरल होणे चुकीचे आहे. भाजप शिस्तबद्ध पद्धतीने काम करणारी पार्टी आहे. ज्यांनी कोणी हा व्हिडिओ बाहेर आणला असेल त्याला वरिष्ठांकडून विचारणा होईलच, असं रक्षा खडसे म्हणाल्या.

काही विषय असेल तर ….

कोअर कमिटीचा व्हिडीओ बाहेर यांचे हे चुकीचं आहे. त्याचीच खंत वाटतेय. आमच्यात कोणताही अंतर्गत वाद नाही. काही विषय असेल तर चार भिंतीच्या आत बसून आम्ही सोडवतो. एखाद्या विषयावरची चर्चा म्हणजे नाराजी नसते. पण व्हिडीओ व्हायरल करून तसं भासवलं जात आहे, असंही त्या म्हणाल्या.

Latest Posts

Don't Miss