Monday, November 18, 2024

Latest Posts

छगन भुजबळ यांना उमेदवारी दिल्यास आम्ही मोठं बंड करू : शिंदे गटाकडून इशारा

| TOR News Network | Chhagan bhujbal Latest News : नाशिक लोकसभा मतदारसंघावरुन भाजप आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यातच या जागेवर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे निवडणूक लढवणार, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावरून शिंदे गटातील पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. छगन भुजबळ यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास बंड करू, असा इशारा शिवसैनिकांनी दिलाय. (Shinge group Aggresive on bhujbal)

शिवसेना पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. काही वेळातच मुंबईत या बैठकीला सुरुवात होणार आहे. पालकमंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि नाशिक शिवसेना शहराध्यक्ष प्रवीण तिदमे यांची बैठकीला उपस्थिती असणार आहे. (Shinde call urgent meeting)

भाजप आणि शिंदे गटात वाकयुद्ध

नाशिक लोकसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार हेमंत गोडसे हेच निवडणूक लढवणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर भाजप आणि शिंदे गटात चांगलंच वाकयुद्ध सुरु झालं होतं.महायुतीतील जागावाटपावर वरिष्ठ चर्चा करत असताना श्रीकांत शिंदे यांनी कोणाला विचारून नाशिक लोकसभेची उमेदवारी जाहीर केली? असा संतप्त सवाल भाजप पदाधिकाऱ्यांनी विचारला होता. इतकंच नाही, तर भाजपने यंदा नाशिकच्या जागेवर उमेदवार द्यावा, अशी मागणी देखील भाजप पदाधिकारी करीत होते.

दरम्यान, नाशिक लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात वाद रस्सीखेच सुरु असताना अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे भाजपच्या तिकीटावर नाशिक लोकसभेची निवडणूक लढवणार, अशी चर्चा सुरु झाली. या चर्चेनंतर शिंदे गटातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरल्याचं कळतंय.

नाशिकमधील मराठा बांधव आक्रमक

नाशिक लोकसभेतून मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी दिल्यास आम्ही मोठं बंड करू, असा इशाराच शिवसैनिकांनी केला आहे. भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी बेताल विधाने केल्यामुळे नाशिकमधील मराठा बांधव आक्रमक आहेत.(Maratha brothers in Nashik are aggressive) ते भुजबळ यांच्याविरोधात प्रचार करू शकतात. यामुळे महायुतीला मोठा फटका बसू शकतो, असं शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

Latest Posts

Don't Miss