| TOR News Network | Sanjay Nirupam Press Today : मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझ्यासमोर आता सगळे पर्याय उपलब्ध आहेत. आता आरपारची लढाई होईल. येत्या आठवड्याभरात तुम्हाला घोषणा ऐकायला मिळू शकते, असे सांगत संजय निरुपम यांनी काँग्रेस मधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. आता ते कोणता पर्याय निवडणार ? भाजपात जाणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Sanjay Nirupam might join bjp)
महाराष्ट्रात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने आज लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यातील उमेदवारांची नावं जाहीर झाली आहेत. मात्र ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर यांना उत्तर पश्चिम मुंबईतून तिकीट दिल्याने काँग्रेस नेते संजय निरुपम संतापले आहेत.(sanjay nirupan angry on seat allocation) खिचडी चोर उमेदवारासाठी मी काम करणार नाही असे निरुपम यांनी स्पष्ट केलं आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांतून उमेदवारांची नाव जाहीर होत आहेत. मविआमध्ये अद्याप काही जागांबद्दल चर्चा सुरू असताना आता ठाकरे गटाने त्यांच्या उमेदवारांची नाव जाहीर केल्याने वादाची ठिणगी पडली आहे. अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीमुळे संजय निरुपम नाराज झाले असून ते काँग्रेस सोडून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.